सटाण्यात दरोडेखोरांच्या चकमकीत घरमालक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 12:56 AM2017-08-12T00:56:11+5:302017-08-12T00:56:16+5:30

पिस्तूलचा धाक दाखवून एका घरावर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या दरोडेखोरांच्या चकमकीत घरमालक जखमी झाला. ही घटना शहरातील भाक्षी रोडवरील क्रांतीनगर भागात शुक्र वारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली. या झटापटीत दहा हजार रु पयांचा मोबाइल दरोडेखोरांनी चोरून पोबारा केला. दरम्यान, दरोडेखोरांच्या झटापटीत घराजवळ सापडलेले पिस्तूलचे एक मेग्झीन व तीन जिवंत काडतूस सटाणा पोलिसांनी जप्त केले आहेत.

 Homeowner injured in encounter with robbers | सटाण्यात दरोडेखोरांच्या चकमकीत घरमालक जखमी

सटाण्यात दरोडेखोरांच्या चकमकीत घरमालक जखमी

Next

सटाणा : पिस्तूलचा धाक दाखवून एका घरावर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या दरोडेखोरांच्या चकमकीत घरमालक जखमी झाला. ही घटना शहरातील भाक्षी रोडवरील क्रांतीनगर भागात शुक्र वारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली. या झटापटीत दहा हजार रु पयांचा मोबाइल दरोडेखोरांनी चोरून पोबारा केला. दरम्यान, दरोडेखोरांच्या झटापटीत घराजवळ सापडलेले पिस्तूलचे एक मेग्झीन व तीन जिवंत काडतूस सटाणा पोलिसांनी जप्त केले आहेत. शहरातील भाक्षी रोडवरील क्रांतीनगर भागात भारतीय जीवन विमा निगमचे एजंट योगेश बाळासाहेब भदाणे हे आपल्या परिवारासह बंगल्यात राहतात . शुक्र वारी पहाटे चार वाजेच्या सुमारास चार ते पाच दरोडेखोरांनी बंगल्याच्या मागील दरवाज्याचे कडी कोयंडे तोडून आत प्रवेश केला. कुणीतरी घरात प्रवेश केल्यामुळे भदाणे यांच्या वडीलांनी आरडाओरडा केल्याने योगेश यांना जाग आली. तेव्हा दरोडेखोरांनी पिस्तुलचा धाक दाखवुन योगेश यांच्याकडे पैसे ,सोन्याच्या दागिन्यांची मागणी केली . मात्र योगेश यांनी त्यांना प्रतिकार करून मज्जाव करण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत मोबाइल चोरणाºया एका दरोडेखोराला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्या साथीदारांनी लोखंडी सळईने हातावर वार केल्याने ते पळून जाण्यात यशस्वी झाले. दरम्यान दरोडेखोरांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या भदाणे यांनी तत्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पोलीस यंत्रणा येई पर्यंत ते भाक्षी रोडच्या दिशेने पळून जाण्यात यशस्वी झाले. दरम्यान योगेश यांच्या बंगल्या जवळ दरोडेखोरांशी झालेल्या झटापटीत तीन जिवंत काडतूस व पिस्तुलचे मेग्झीन सापडले असून पोलिसांनी ते जप्त केले आहे. घटना स्थळी आज मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार ,पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी अज्ञात दरोडेखोरांविरु द्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील क्र ांतीनगर भागातील रहीवाशी नितीन काशिनाथ पवार हे बाहेर गावी गेल्याचा फायदा घेऊन बंगल्याचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला. मात्र त्यांना रिकाम्या हाती परतावे लागले. त्यानंतर दरोडेखोरांनी जवळच असलेले रामदास जिभाऊ अहीरे यांच्या बंगल्याचे कुलूप तोडून कपाटातील वीस हजार रु पयांचा सोने व चांदीचा ऐवज लुटून पोबारा केला. त्यानंतर दरोडेखोरांनी भदाणे यांच्या बंगल्याकडे आपला मोर्चा वळविला.

Web Title:  Homeowner injured in encounter with robbers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.