परप्रांतीय भाडेकरूंच्या माहितीबाबत घरमालक उदासीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 07:26 PM2019-01-15T19:26:03+5:302019-01-15T19:37:09+5:30
घोटी : वाडीवºहे, मुंढेगाव, गोंदे दुमाला, इगतपुरी, घोटी परिसरात इतर जिल्ह्यासह परप्रांतीय कामगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विस्तारत चाललेल्या गावांमध्ये भाड्याने देण्यात येणाऱ्या इमारती वाढत चालल्या असून त्याही सध्या कमी पडत आहे. सर्वच भाडेकरूबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात माहिती देण्यास घरमालक टाळाटाळ करीत आहेत. परिणामी गुन्हेगारांचे उच्चाटन करण्यासाठी पोलिसांनाच घरमालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे लागणार आहेत. पोलिसांनी याबाबत सूक्ष्म तपास सुरू केल्याचे समजते.

इगतपुरी, वाडीवºहे, मुंढेगाव, गोंदे दुमाला, घोटी ह्या गावांसह परिसरात भाड्याने देण्यासाठी अनेकांनी इमारती उभारलेल्या आहेत. तालुक्यातील विविध कारखान्यांमध्ये परप्रांतीय कामगारांचे लोंढेच्यालोंढे वाढले आहेत. कमी पगारात अधिक काम करीत असल्यामुळे परप्रांतीय आणि बाहेर जिल्ह्यातील मजुरांना मागणी आहे. यामुळे ह्या मजुरांना राहण्यासाठी भाड्याने खोल्या देण्याचा धंदा तेजीत आलेला दिसतो. मात्र बहुसंख्य घरमालकांनी भाडेकरूंची माहिती स्थानिक पोलीस ठाण्याला दिलेली नाही. प्रचलित कायद्याप्रमाणे अशी माहिती बंधनकारक असूनही घरमालक टाळाटाळ करीत आहेत. भाडेकरूंच्या कुटुंबातील सर्वांचे आधारकार्ड, शिधा पत्रिका, मोबाईल क्र मांक, मूळ गावाची माहिती, भाडे करारनामा, फोटो अशी परिपुर्ण माहिती घेऊन पोलीस ठाण्यात देण्याचे घरमालकांना सक्तीचे आणि महत्वाचे असतांना देखिल घरमालकांनी त्याकडे दुर्लक्ष्य केले आहे. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना ह्या भागात सुरक्षितता वाटते आहे. परिणामी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.
लहान लहान खोल्यांमध्ये परप्रांतीय कामगार जास्त भाडे देऊन राहत असल्याने मिळणाºया जास्त घरभाडयामुळे घरमालकही जास्त खोलात जात नाही ही वस्तुस्थिती आहे.
प्रेमप्रकरणात पळून आलेल्या जोडप्यांचे ह्या भागात वास्तव्य दिसून आले आहे. एकाच भाड्यात तीन तीन परिवार दाटीवाटीने राहत असल्याचेही समजते. यासह बाहेर गैरप्रकार करणाºयांना भाडेकरू घरात घेऊन संरक्षित करतात.
भाडेकरू नागरिकांबाबत जवळच्या पोलीस ठाण्यात आवश्यक पुराव्यांसह घरमालकांनी माहिती देणे बंधनकारक आहे. नागरिकांच्याच सुरक्षिततेसाठी दक्षता घेणे आवश्यक आहे. भाडेकरूंची माहिती न देणाºया घरमालकांवर आम्ही कारवाई करणार आहोत.
- सुहास देशमुख,
पोलीस निरीक्षक वाडीवºहे.
अनेक परप्रांतीय भाडेकरू व्यसनाधीन आहेत. रोजची भांडणे करून सर्वांना त्रस्त करतात. यामुळे स्थानिक महिलांची सुरक्षितता वाºयावर आहे. घरमालकांनी याबाबत पोलिसांना सहकार्य केल्यास गुन्ह्यांना आळा बसू शकेल किंवा तपासाला नक्की मदत होवू शकते.
- एक त्रस्त गृहिणी.