एक लाखाच्या बुलेटसह होंडा शाईन लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2021 01:24 IST2021-11-22T01:24:36+5:302021-11-22T01:24:57+5:30
चोरट्यांनी दुचाकी चोरीचा धडाका सुरूच ठेवला आहे. उपनगर पोलीस ठाणे हद्दीतून चोरांनी बिटको महाविद्यालयाच्या शेजारून रॉयल एन्फिल्डची सुमारे एक लाख रुपये किमतीची बुलेट गायब केल्याची घटना घडली आहे.

एक लाखाच्या बुलेटसह होंडा शाईन लंपास
नाशिक : चोरट्यांनी दुचाकी चोरीचा धडाका सुरूच ठेवला आहे. उपनगर पोलीस ठाणे हद्दीतून चोरांनी बिटको महाविद्यालयाच्या शेजारून रॉयल एन्फिल्डची सुमारे एक लाख रुपये किमतीची बुलेट गायब केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी योगेश शिवराम गायधनी (३८, रा. पळसे) यांच्या फिर्यादीवरून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या घटनेत पंचवटी चिंचबन येथून हर्षद राजेंद्र बोरसे (२२) यांच्या मालकीची दुचाकी (एमएच १५ जीके १३०१) चोरट्यांनी चोरी केली. विशेष म्हणजे, सोसायटीच्या वाहनतळात येऊन चोरांनी ही दुचाकी लांबविली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.