प्रामाणिक लोकांनी राजकारणात येण्याची गरज - बच्चू कडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 12:18 AM2019-08-18T00:18:56+5:302019-08-18T00:20:14+5:30
दिंडोरी : निवडणुका खर्चिक व राजकारण बिनभरवशाचे झाले असले तरी लोकशाहीमध्ये निवडून येऊन शासनाच्या माध्यमातून लोकांची सेवा जास्त चांगल्या प्रकारे करण्याचे मार्ग सापडतात. म्हणून जात, धर्म न पाहता काम बघून आपला प्रतिनिधी निवडून दिल्यास प्रामाणिक व सेवाभावी लोक राजकारणात येतील व त्यांनी लोकांची सेवा निरपेक्ष भावनेने केली तर लोक त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे नक्कीच उभे राहतील.
लोकमत न्यूज नेटवर्क

राजकारणात तरु ण, प्रामाणिक व सेवाभावी लोकांनी येण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी केले. मोहाडी (ता. दिंडोरी) येथील श्रीकृष्ण जन्मोत्सव, ग्रामदैवत मोहाड मल्ल व कान्होबा यात्रेनिमित्त आयोजित कर्मयोगी एकनाथभाऊ जाधव प्रतिष्ठानच्या ६४व्या प्रबोधन व्याख्यानमालेत विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष निवृत्ती रामचंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ ‘राजकारण आणि समाजव्यवस्था’ या विषयावर सहावे पुष्प गुंफताना कडू बोलत होते.
यावेळी दिंडोरीचे पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे, डॉ. भाऊसाहेब मोरे, प्रवीण जाधव, सुरेश कळमकर, बाळासाहेब कदम, विलास पाटील, शिवाजी पाटील, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अनिल भडांगे, उत्तर महाराष्ट्र प्रमुख दत्तू बोडके, उपजिल्हाप्रमुख गणेश निंबाळकर, अजित आव्हाड, प्रतीक देशमुख व पदाधिकारी उपस्थित होते.
पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह अनेक दिव्यांग बांधव उपस्थित होते. कार्यक्र माचे प्रास्ताविक व परिचय धनंजय वानले यांनी करून दिला. सूत्रसंचालन फाउण्डेशनचे अध्यक्ष तथा प्राचार्य विलास देशमुख यांनी केले. आभार संजय डिंगोरे यांनी मानले.