विद्यार्थिनीचा प्रामाणिकपणा, ४० हजारांची अंगठी केली परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 12:54 PM2020-01-07T12:54:16+5:302020-01-07T12:54:27+5:30

पेठ -घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शिक्षणाचा खर्चही भागवू शकत नसलेल्या राजश्री शासकिय आश्रमशाळेत शिक्षणाचे धडे गिरवतांना संस्काराचेही धडे समृध्दपणे गिरल्याचा अनुभव आला. शालेय परिसरात शिक्षकाची ४० हजार रूपये किमतीची हरवलेली सोन्याची अंगठी जयश्रीला सापडली आणि तिने क्षणाचाही विलंब न लावता संबंधित शिक्षकांना अंगठी परत करून विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला.

 The honesty of the student, the ring of 3 thousand has been returned | विद्यार्थिनीचा प्रामाणिकपणा, ४० हजारांची अंगठी केली परत

विद्यार्थिनीचा प्रामाणिकपणा, ४० हजारांची अंगठी केली परत

googlenewsNext

पेठ -घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शिक्षणाचा खर्चही भागवू शकत नसलेल्या राजश्री शासकिय आश्रमशाळेत शिक्षणाचे धडे गिरवतांना संस्काराचेही धडे समृध्दपणे गिरल्याचा अनुभव आला. शालेय परिसरात शिक्षकाची ४० हजार रूपये किमतीची हरवलेली सोन्याची अंगठी जयश्रीला सापडली आणि तिने क्षणाचाही विलंब न लावता संबंधित शिक्षकांना अंगठी परत करून विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला.
धानपाडा ता. पेठ या अनिदुर्गम गावातील राजश्री दरोडे ही बोरवठ येथील शासकिय आश्रमशाळेत इयत्ता सातवीत शिक्षण घेते. शनिवारी शाळेतील शिक्षक अमोल कांबळे क्रि डांगणावर मुलांचे खेळ घेत असतांना त्यांच्या बोटातील एक तोळ्याची ४० हजार रूपये किंमतीची सोन्याची अंगठी हरवली. शाळा सुटल्यानंतर याच जागेवरून जयश्री जात असतांना तिला अंगठी सापडली. इकडे शिक्षकांच्या अंगठी हरवल्याचे लक्षात आल्यावर शोधाशोध सुरू असतांना राजश्रीने तात्काळ शिक्षकांची भेट घेऊन प्रामाणकिपणे अंगठी परत केली. राजश्रीच्या या प्रामाणकिपणाबद्दल मुख्याध्यापक मनोहर मोरे यांचे हस्ते तिचा पारितोषिक प्रदान करून गौरव करण्यात आला. याप्रसंगी सागर कन्हेरे, जानकी कहांडोळे, हेमराज महाले, पांडूरंग चौधरी, अमोल कांबळे यांचे सह शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.
-------------------------------------
शाळेत शिक्षण घेत असतांना शिक्षक नेहमी संस्काराचे धडे शिकवत असतात. माङया शिक्षकांची हरवलेली महागडी वस्तू परत करण्यात माझा स्वाभिमान जागा झाला. यामुळे मला स्वार्थापेक्षा स्वाभिमान महत्वाचा वाटला. माझी ही कृती इतर मुलांनाही प्रेरणादायी ठरणार आहे.
-राजश्री दरोडे, विद्यार्थिनी

Web Title:  The honesty of the student, the ring of 3 thousand has been returned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक