अलविदा-२०२० एचएएलमध्ये ‘हनी ट्रॅप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:15 AM2020-12-31T04:15:04+5:302020-12-31T04:15:04+5:30

--- नाशिक परिक्षेत्राच्या विशेष महानिरीक्षकपदी दिघावकर - नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी डॉ.प्रतापवराव दिघावकर यांची सप्टेंबर महिन्यात नियुक्ती करण्यात ...

Honey Trap in HAL 2020 - HAL | अलविदा-२०२० एचएएलमध्ये ‘हनी ट्रॅप’

अलविदा-२०२० एचएएलमध्ये ‘हनी ट्रॅप’

Next

---

नाशिक परिक्षेत्राच्या विशेष महानिरीक्षकपदी दिघावकर

- नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी डॉ.प्रतापवराव दिघावकर यांची सप्टेंबर महिन्यात नियुक्ती करण्यात आली. त्यांनी पदभार स्वीकारताच उत्तर महाराष्ट्र गुटखा-मटका मुक्त करण्याचा मानस व्यक्त करत कारवाईचा धडाका सुरू केला. शेतकऱ्यांचे बुडविलेले कोट्यवधी रुपये व्यापाऱ्यांकडून पुन्हा मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केल्याने ते तत्काळ चर्चेत आला.

---

आर्टीलरी सेंटरमधून एक संशयित ताब्यात

-देवळाली कॅम्पमधील आर्टीलरी सेंटरमध्ये मोबाइलद्वारे छायाचित्रण करताना संशयित संजीवकुमार यास जवानांनी ताब्यात घेत पोलिसांच्या हवाली केले. त्याची कसून चौकशी करण्यात आली.

---

उत्तर महाराष्ट्रात १३३ लाचखोर लोकसेवक जाळ्यात

सरकारी कार्यालयांमध्ये सर्वसामान्यांची विविध कामांसाठी अडवणूक करत लोकसेवकांकडून सर्रासपणे लाच मागण्याचे प्रमाण अद्यापही कमी झालेले दिसून येत नाही. उत्तर महाराष्ट्रात या वर्षभरात तब्बल १३३ लाचखोर लोकसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले. सर्वाधिक ३२ सापळे अहमदनगर जिल्ह्यात, तर त्या पाठोपाठ नाशिकमध्ये २७ सापळे विभागाने यशस्वीरीत्या रचले गेले.

---

तिरंग्याशेजारी संयुक्त राष्ट्राचा फडकला ध्वज

या वर्षी प्रथमच ऑक्टोबर महिन्यात भारत सरकारकडून २४ तारखेला संयुक्त राष्ट्र दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने प्रथमच पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीवर तिरंग्याशेजारी संयुक्त राष्ट्राचा ध्वजही फडकलेला नाशिककरांना पाहावयास मिळाला होता.

---

सीएए-एनआरसीविरोधात नाशकात ‘सादिक बाग’

-नाशिकमधील ईदगाह मैदानावर सीएए-एनआरसीविरोधात मुस्लीम महिलांनी ‘शाहीन बाग’च्या समर्थनार्थ ‘सादिक बाग’ आंदोलन करत ठिय्या आंदोलन केले होते. यावेळी महिलांनी दिवसभर घोषणाबाजी करत ‘संविधान के सन्मान में, हम आये मैदान में...’ अशा घोषणा देत लक्ष वेधून घेतले होते.

---

ईदगाह मैदानावर नमाजपठणाचा सोहळ रद्द

रमजान ईद, बकरी ईद या सणांचे पारंपरिक सामूहिक नमाजपठण या वर्षी शहरातील ऐतिहासिक शहाजहांनी ईदगाह मैदानावर झाले नाही. कोरोनाचे सावट आणि लॉकडाऊन काळात हे दोन्ही सण समाजबांधवांनी आपआपल्या घरात साधेपणाने साजरे केले.

Web Title: Honey Trap in HAL 2020 - HAL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.