हॉर्नमुळे झाला लाखमोलाच्या दुचाकी चोरीचा उलगडा़़़ दोन अल्पवयीन दुचाकी चोरटे ताब्यात : एक अभियांत्रिकीचा विद्यार्थी
By admin | Published: December 10, 2014 01:45 AM2014-12-10T01:45:30+5:302014-12-10T01:47:33+5:30
हॉर्नमुळे झाला लाखमोलाच्या दुचाकी चोरीचा उलगडा़़़ दोन अल्पवयीन दुचाकी चोरटे ताब्यात : एक अभियांत्रिकीचा विद्यार्थी
सिडको : दुचाकी चोरून नेत असताना चोरट्यांकडून अचानक दुचाकीचा हॉर्न वाजतो अन् दुचाकीमालक हॉर्न कुणी वाजवला हे पाहण्यासाठी घराबाहेर येतो़ बाहेर आल्यानंतर डोळ्यासमोर दुचाकी चोरून नेत असल्याचे पाहून ते नागरिकांच्या मदतीने या चोरट्यांचा पाठलाग करून त्यांना पकडतात़ दरम्यान जमलेले संतप्त नागरिक एका चोरट्याला पकडून जाम चोपही देऊन पोलिसांच्या हवाली करतात़ केवळ हॉर्नमुळेच आपली सव्वा लाख रुपयांची दुचाकी वाचल्याची प्रतिक्रिया दुचाकीमालक व्यक्त करतात़ दरम्यान हे दोन्ही चोरटे अल्पवयीन असून त्यातील एक अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे़ कामटवाडे येथील देवराम नगरमध्ये राहणारे सुमीत विश्वास गुंजाळ यांची सव्वा लाख रुपये किमतीची यामाहा कंपनीची दुचाकी (एमएच १५ डीक्यु ३४७८) आहे़ दुपारच्या सुमारास दुचाकी घराबाहेर उभी करून ते आराम करीत होते़ यावेळी सावतानगर व कामटवाडे येथील दोघे अल्पवयीन चोरटे स्कुटीवर (एमएच १५, सीआर ५४२८) आले़ त्यातील एकाने दुचाकी डायरेक्ट केली व निघाला तर दुसरा स्कुटीवर घरापासून थोडेसे अंतर पुढे गेले असता यामाहा दुचाकीचा हॉर्न वाजला़ यामुळे घरात बसलेले गुंजाळ घराबाहेर हॉर्न कुणी वाजविला हे पाहण्यासाठी आले़