कला क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान
By admin | Published: March 23, 2017 01:03 AM2017-03-23T01:03:20+5:302017-03-23T01:03:34+5:30
नाशिक : कलावंत विचार मंच यांच्यातर्फे विविध पुरस्कारांचे बुधवारी (दि. २२) पं. विष्णू दिगंबर पलुस्कर सभागृह, इंद्रकुंड येथे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
नाशिक : कलावंत विचार मंच यांच्यातर्फे विविध पुरस्कारांचे बुधवारी (दि. २२) पं. विष्णू दिगंबर पलुस्कर सभागृह, इंद्रकुंड येथे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. राज्यातील कलावंत, लोक कलावंत, लेखक, कवी, गीतकार, गायक आदि क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या कलावंतांना यावेळी सन्मानित करण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळ्याअंतर्गत वामनदादा कर्डक मरणोत्तर पुरस्कार (दुष्यंत वाघ), शाहीर अमर शेख मरणोत्तर पुरस्कार (मल्लिका शेख), विठाबाई नारायणगावकर मरणोत्तर पुरस्कार (मोहित नारायणगावकर) यांच्यासह कमलेश रूपवते, आनंदा साळवे, प्रा. डॉ. सुनील शिंदे, डॉ. ज्ञानेशानंद शास्त्री महाराज, अस्मिता कानेकर, अनिल बहिरट, कॉ. यादवराव पावसे, बाबासाहेब पाटील, माधवी देशमुख, अमर ठोंबरे या कलावंतांसह ‘नि:शस्त्र योद्धा’, ‘रखेली’ आणि ‘जंमत जगावेगळी’ या तीन नाट्यकलाकृतींनादेखील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. प्रमुख पाहुणे प्रा. गंगाधर अहिरे आणि नानाजी शिंदे यांनी लोककला जिवंत रहायला हवी, लोककलांचे जतन व्हायला हवे असे आवाहन केले. यावेळी प्रा. गंगाधर आहिरे, नानाजी शिंदे, दत्ता वाघ, माणिक कानडे उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रज्ञा काळे आणि कविता गायकवाड यांनी, तर प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष सुनील मोंढे यांनी केले. (प्रतिनिधी)