ब्राह्मण संस्थेतर्फे सन्मान सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:10 AM2017-08-28T00:10:49+5:302017-08-28T00:10:56+5:30

Honor ceremony by Brahman Institute | ब्राह्मण संस्थेतर्फे सन्मान सोहळा

ब्राह्मण संस्थेतर्फे सन्मान सोहळा

Next

नाशिक : शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण संस्थेच्या वतीने गुरुतुल्य व्यक्तींचा गुरुपूजन व सत्कार सोहळा संपन्न झाला.
ऋषीपंचमीनिमित्त आयोजित या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य नारायण पंडित, ज्योतिर्विद मोहनशास्त्री दाते, योगाचार्य पौर्णिमा मंडलिक, महंत माधवगिरी महाराज उपस्थित होते. अध्यक्षस्थानी सतीश शुक्ल होते. यावेळी मोहनशास्त्री दाते यांनी सांगितले की, संस्थेतर्फे गेल्या नऊ वर्षांपासून आदर्श गुरुतुल्य व्यक्तींचा सत्कार करून आणला जात आहे. यावेळी प्राचार्य नारायण पंडित, पौर्णिमा मंडलिक आदिंनी मनोगत व्यक्त केले.  यावेळी राजश्री शौचे यांनी स्वागत केले. पंडित वैभव दीक्षित, पंडित भूषण शुक्ल, उदय जोशी यांनी परिचय करून दिला. याप्रसंगी माधवराव भणगे, तुषार जोशी, चंद्रकांत महाजन, मेघावती साताळकर, शशिकला शिंगणे, उदयकुमार मुंगी, अनिल देशपांडे यांनी मान्यवरांचा सत्कार केला. भानुदास शौचे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन ओमकार शौचे यांनी केले. दिलीप शुक्ल यांनी आभार मानले. यावेळी पंडित रवींद्र देव, उपेंद्र शुक्ल, राजश्री शौचे, प्रा. लक्ष्मीकांत भट, लिना चांदवडकर, रोहिणी जोशी, अनिता कुलकर्णी, योगेश जोशी, राजन कुलकर्णी, अनिल देशपांडे, शांता जाधव, धनंजय पुजारी, रत्नप्रभा गर्गे, नीता गर्गे, अनिल नांदुर्डीकर, पंडित उपेंद्र देव आदि उपस्थित होते.
मान्यवरांचा सन्मान
शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेच्या वतीने मान्यवरांचा पगडी, सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यात प्राचार्य नारायण पंडित, माधवगिरी महाराज, वीणा व मोहन दाते, पौर्णिमा व विश्वास मंडलिक, पुष्पा व दिलीप गोटखिंडीकर, सुमती बापट, डॉ. मीनाक्षी व डॉ. मनोहर बापये, सुनीता व श्रीकांत रहाळकर, शामला व मोरेश्वर फडके, मालती व श्रीराम देशपांडे, सविता व सतीश मुजुमदार, हेमा व सदानंद जोशी, वासंती व वसंत शास्त्री शुक्ल, शैलजा व विजयकुमार पैठणकर, प्रभाकर धर्माधिकारी, ज्योती व रमाकांत देशपांडे, वृंदा व रमाकांत देशपांडे, केतकी व अनिल थत्ते, मीरा व पुरुषोत्तम देशपांडे, दत्तात्रय भानोसे, मोहिनी भारदे, दिनेश बर्डेकर, मुजफ्फर सैय्यद यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Honor ceremony by Brahman Institute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.