जीव धोक्यात घालून महिलेला वाचविणाऱ्या चिमुरडीचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 08:47 PM2020-01-06T20:47:04+5:302020-01-06T20:49:31+5:30
घोटी : स्वत:चा जीव धोक्यात घालून बुडणाºया विवाहित महिलेला वाचवणाºया १२ वर्षीय चिमुरडीला वाडीवºहे पोलिसांनी सन्मानित केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
घोटी : स्वत:चा जीव धोक्यात घालून बुडणाºया विवाहित महिलेला वाचवणाºया १२ वर्षीय चिमुरडीला वाडीवºहे पोलिसांनी सन्मानित केले.
काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशी म्हण आहे. विहिरीवर पाणी भरतांना पाय घसरून विहिरीत पडलेल्या विवाहित महिलेचा आवाज ऐकून १२ वर्षीय सविता बेंडकुळे हिचे कर्तृत्व राज्याच्या पुरस्कारासाठी पाठवण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांनी सांगितले.
२१ डिसेंबरला गडगडसांगवी येथील एका विहिरीवर शोभा मधुकर पाडेकर ही विवाहित महिला पाणी भरण्यासाठी आली होती. पाणी शेंदतांना ओल्या जागेमुळे तिचा पाय घसरल्याने ती पाण्यात पडली. तिला पोहता येत नसल्याने तिने जिवाच्या आकांताने आरडा ओरडा केला.
हे ऐकून अवघी १२ वर्ष वयाची चिमुरडी सविता भाऊसाहेब बेंडकोळी (रा. गडगडसांगवी) हिने कुठलाही विचार न करता पाण्यात उडी घेतली. अवघ्या काही मिनिटांत सविताने शोभा हिला वाचवले. परिसरातील ग्रामस्थांनी सविता हिच्या शौर्याचे विशेष कौतुक केले.
याबाबत वाडीवºहे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांना समजल्यानंतर त्यांनी सविताला शाबासकी दिली. ‘रेझिंग डे’ कार्यक्र माच्या निमित्ताने जीव रक्षक सविता बेंडकोळी हिला उपस्थित मान्यवरांनी कौतुक करून सन्मानित केले. पोलीस ठाण्यातर्फे तिच्या शौर्यशाली कामगिरीबाबत सन्मानपत्र देण्यात आले.
तिच्या कार्याची दखल घेऊन राज्य पुरस्कारासाठी तिचा प्रस्ताव पाठवणार असल्याचे पोलीस निरीक्षक जाधव यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी गोपनीय पोलीस सोमनाथ बोराडे, बबन सोनवणे, देविदास फड आदींसह ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते.