मानूर ग्रामपंचायतीतर्फे कोरोना योद्ध्यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 10:25 PM2020-07-03T22:25:50+5:302020-07-04T00:29:40+5:30
कळवण : तालुक्यातील मानूर ग्रामपंचायत व कोरोना प्रतिबंध समितीच्या वतीने आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडीसेविका, आशा कार्यकर्ती ...
कळवण : तालुक्यातील मानूर ग्रामपंचायत व कोरोना प्रतिबंध समितीच्या वतीने आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडीसेविका, आशा कार्यकर्ती या कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला.
मानूर गावात दि. १८ जून रोजी आढळलेला एक रुग्ण उपचार घेऊन बरा झाला. गावाने योग्य नियोजन केल्याने येथे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आले असून, गावाने कोरोनामुक्तीसाठी केलेले कार्य तालुक्यासाठी आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार तहसीलदार बंडू कापसे यांनी काढले. यावेळी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, डॉ. राजेश काटे, सरपंच योगेश चव्हाण उपस्थित होते. आरोग्य सहाय्यक बाजीराव सूर्यवंशी यांनी मनोगतात गावात राबविलेल्या विविध योजना तसेच ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांनी केलेल्या सहकार्यामुळे गाव कोरोनामुक्त झाल्याचे सांगितले. याप्रसंगी आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडीसेविका, आशा कार्यकर्ती यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रास्तविक रवींद्र बोरसे यांनी तर आभार ग्रामसेवक एस. टी. पाटील यांनी मानले. कार्यक्रमास उपसरपंच यशोदा पवार, जे.एम. ठाकरे, मंजूषा जाधव, कल्पना भामरे आदी उपस्थित होते.