ज्ञानेश्वर गुंजाळ यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:10 AM2021-07-05T04:10:48+5:302021-07-05T04:10:48+5:30
कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम २०२० मध्ये पीक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर पीक स्पर्धेमध्ये न्हनावे येथील शेतकरी ...
कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम २०२० मध्ये पीक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर पीक स्पर्धेमध्ये न्हनावे येथील शेतकरी गुंजाळ यांनी हरभरा पिकाचे विक्रमी उत्पादन काढल्याने, विभाग स्तरावर त्यांना सर्व साधारण गटामध्ये द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. गुंजाळ यांनी हरभरा पिकाचे प्रति हेक्टरी ३३.८८ क्विंटल इतके उत्पादन काढले, तसेच तालुकास्तरीय विजेत्यांमध्ये गहू पिकासाठी प्रथम पारितोषिक वडनेरभैरव येथील संपत ग्यानू निखाडे यांनी पटकावले. भडाणे येथील दगू किसन आहेर यांनी द्वितीय तर पिंपळगाव धाबली येथील दादा रेवजी जाधव यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. हरभरा पिकामध्ये तालुका स्तरावर वडाळीभोई येथील रामनाथ रामचंद्र निफाडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तालुकास्तरीय विजेत्यांना कृषी दिन निमित्ताने पंचायत समिती सभागृहात सन्मानित करण्यात आले.
फोटो - 04 एम.एम.जी 1- न्हनावे येथील शेतकरी ज्ञानेश्वर गुंजाळ यांचा सपत्नीक सत्कारप्रसंगी पालकमंत्री छगन भुजबळ व मान्यवर.