डॉक्टर्स, आशासेविका यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 09:29 PM2020-11-11T21:29:43+5:302020-11-12T00:48:04+5:30
विल्होळी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविड- १९ विरोधी लढाईत जिवाची पर्वा न करता योगदान देणाऱ्या कारोनायोद्धा डॉक्टर्स, अशासेविका यांचा सन्मान करण्यात आला.
विल्होळी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविड- १९ विरोधी लढाईत जिवाची पर्वा न करता योगदान देणाऱ्या कारोनायोद्धा डॉक्टर्स, अशासेविका यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी हेमंत थोरात, अर्चना थोरात, बाळकृष्ण थोरात, महेश थोरात, आरोग्य सहायक एकनाथ वाणी, आरोग्यसेवक सोनाली पगार, वनिता मंडाले, गटप्रवर्तक अर्चना गडाख, आरोग्यसेवक मनोज देवरे उपस्थित होते.
विल्होळी आरोग्य उपकेंद्रांतर्गत डॉक्टर्स व आशासेविका यांनी कोरोना महामारीच्या काळात गावातील लोकांमध्ये जागृती केली. कोरोनाबाधिताजवळ घरातील लोक जाण्यास घाबरत असताना आशासेविका या काळात लोकांच्या घरी जाऊन वेगवेगळ्या तपासण्या करत, औषध उपचार करून सुविधा पुरवत होते.
तुटपुंज्या मानधनावर घरचे काम सांभाळून आशासेविकांनी गावाचे आरोग्य टिकविण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेतली. गावातील कोरोना साथीवर नियंत्रण ठेवण्यात त्यांना यश मिळाले. त्याचबरोबर गरोदर महिला व नवजात बालके त्यांची देखभाल केली. याची दखल घेत सामाजिक भावनेतून डॉक्टर्स व आशासेविका यांचा सन्मान करण्यात आला.
विल्होळी येथे सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने डॉक्टर्स, आशासेविका यांचा कोरोनायोद्धा म्हणून सन्मान करताना हेमंत थोरात, अर्चना थोरात, मनोहर भावनाथ, महेश थोरात, रंजन कदम, बाबासाहेब गोसावी, संतोष गायकवाड, महेश थोरात बाळकृष्ण थोरात आदी.