जळगाव खुर्द येथे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 11:07 PM2020-01-19T23:07:58+5:302020-01-20T00:10:21+5:30
नांदगाव तालुक्यातील जळगाव खुर्द येथे उमेद अभियान व महिला सन्मान मेळावा पार पडला. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभाग सभापती अश्विनी आहेर होत्या.
न्यायडोंगरी : नांदगाव तालुक्यातील जळगाव खुर्द येथे उमेद अभियान व महिला सन्मान मेळावा पार पडला. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभाग सभापती अश्विनी आहेर होत्या.
नांदगाव तालुक्यात विविध क्षेत्रात वावरणाऱ्या महिलांना एकत्र आणत हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. सामाजिक क्षेत्रात कार्य करणाºया, ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्यांचाही यात समावेश होता.
व्यासपीठावर गटविकास अधिकारी गणेश चौधरी, पं. स. माजी सभापती विलास आहेर, विद्या पाटील, पं. स. सदस्य अर्चना वाघ, उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक विलास झाल्टे, आश्विन जाधव, विजय पाटील, गोरख सरोदे, नांदगावचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक सुरवाडकर, प्रवीण उबाळे आदी उपस्थित होते. दीपक सुरवाडकर यांनी मनोगत व्यक्त करताना हा उपक्रम स्तुत्य आहे. समाजात वावरणाºया सेवकांचा सत्कार झालाच पाहिजे यासाठी अशाप्रकारचे उपक्रम नियमित होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामसेवक पवन थोरात, सरपंच प्रवीण उबाळे, ग्रा. पं. सदस्य सीमाबाई चव्हाण,भरती बोरसे, उषाबाई सरोदे, सोपान डोखे,गोरख ठाकरे,रावसाहेब सरोदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाºया आरोग्यसेविका अलका सरोदे, मंगल सरोदे, मदतनीस विठाबाई सरोदे, रेखा सरोदे, आशा कार्यकर्त्या शोभा उबाळे, आरोग्य मदतनीस पूजा सरोदे, मनीषा डोखे आदींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.