सायखेडा येथे कोविडयोद्ध्यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 11:04 PM2021-07-05T23:04:12+5:302021-07-06T00:18:35+5:30
सायखेडा : गोदाकाठ व परिसरात कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेतही अविरतपणे आरोग्यसेवा देणाऱ्या कोविडयोद्ध्यांमुळेच गोदाकाठावरील आरोग्यव्यवस्था उत्तम राहिली असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य सुरेश कमानकर यांनी केले.
सायखेडा : गोदाकाठ व परिसरात कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेतही अविरतपणे आरोग्यसेवा देणाऱ्या कोविडयोद्ध्यांमुळेच गोदाकाठावरील आरोग्यव्यवस्था उत्तम राहिली असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य सुरेश कमानकर यांनी केले.
सायखेडा ग्रामपंचायतीकडून सोमवारी गोदाकाठच्या कोविडयोद्ध्यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्य बाळासाहेब चारोस्कर, डॉ. प्रल्हाद डेर्ले, डॉ. सारिका डेर्ले, सरपंच सुजाता कातकाडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य तसेच नूतन सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप शिंदे उपस्थित होते. यावेळी गोदाकाठमध्ये कोरोनाकाळात सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा व आशा स्वयंसेविकांचा सत्कार भाऊसाहेब कातकाडे, मनोज भुतडा, संदीप कुटे, गणेश कातकाडे, हरीश जोंधळे, महेश कुटे, अशपाक शेख यांच्या हस्ते करण्यात आला. येथे डॉ. प्रल्हाद डेर्ले, डॉ. नितीन गिते, डॉ. चेतन कातकाडे, डॉ. आबा पाटील, डॉ. सारिका डेर्ले, डॉ. विजय डेर्ले, डॉ. उल्हास कुटे, डॉ. युनूस शहा यांच्यासह अनिल बोराडे, तुषार घुगे, राजेंद्र पवार, शरद दीक्षित, हेमंत दळवी, अनिल महाजन, शीतल जमधडे, हेमंत सावंत, योगेश केकान, योगेश पगारे या डॉक्टरांसह आपत्ती व्यवस्थापनाकडून मंडळ अधिकारी पी. पी. केवारे, तलाठी प्रसाद देशमुख, ग्रामसेवक हेमंत कापसे, ग्रामपंचायत कर्मचारी नंदलाल पंडित, विनोद लोखंडे, श्याम पुरे व आरोग्यसेविका शीतल जमधाडे, आशासेविका सरला मोरे, सीमा पोटे, अंजुम शेख, चंद्रकला जमदाडे, दीपाली जाधव व आरोग्यसेवक बापू अहिरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक डॉक्टरांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन मनोज भुतडा यांनी केले. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.