नाशिक जिल्ह्याचा दिल्लीत सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 12:18 AM2018-09-28T00:18:59+5:302018-09-28T00:19:12+5:30
नाशिक : ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८’ अंतर्गत देशात सर्वाधिक आॅनलाइन प्रतिक्रिया नोंदविल्या बद्दल नाशिक जिल्ह्यात २ आॅक्टोबरला दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात सन्मान होणार आहे. याच दिवशी मुंबईतील कार्यक्रमात पोषण आहार अभियानात प्रथम स्थान मिळविण्यासाठीही गौरव होईल.
नाशिक : ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८’ अंतर्गत देशात सर्वाधिक आॅनलाइन प्रतिक्रिया नोंदविल्या बद्दल नाशिक जिल्ह्यात
२ आॅक्टोबरला दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात सन्मान होणार आहे. याच दिवशी मुंबईतील कार्यक्रमात पोषण आहार अभियानात प्रथम स्थान मिळविण्यासाठीही गौरव होईल.
पंतप्रधान आवास योजना, स्वच्छ भारत अभियान, दीनदयाळ कौशल्य विकास कार्यक्रम, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान यापाठोपाठ आता जिल्ह्णास स्वच्छ सर्वेक्षण व पोषण आहार अभियान यात चांगले काम केल्याबद्दल सन्मानित करण्यात येणार आहे. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ अंतर्गत जिल्ह्णात मोठ्या प्रमाणात जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात आले. स्वच्छ सर्वेक्षणात आॅनलाइन प्रतिक्रिया नोंदविण्यात नाशिक जिल्हा देशात पहिल्या क्रमांकाचा जिल्हा ठरला आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये ग्रामस्थांनी सहभागी व्हावे यासाठी जिल्ह्णात कुटुंब संपर्क अभियान राबवून घरोघरी गृहभेटी देण्यात आल्या. तसेच सरकारने विकसित केलेल्या मोबाइल अॅप ‘एसएसजी २०१८’च्या माध्यमातून नाशिक जिल्ह्णासाठी मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. यास ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिल्याने जिल्हा २ लाख २१ हजार ३२१ प्रतिक्रिया नोंदवून देशात पहिल्या क्रमांकावर आल्याने नाशिक जिल्ह्णाचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली आहे. ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत जिल्ह्णात यात स्वच्छताफेरी, गृहभेटी, मोटारसायकल फेरी, श्रमदान मोहीम, स्वच्छतेचे फलक आदींद्वारे जनजागृती करण्यात आली. तसेच शाळा, अंगणवाडी, प्राथमिक केंद्र येथील स्वच्छता, स्वच्छतागृहांची स्वच्छता व दुरुस्ती करण्यात आली. विविध ग्रामपंचायतींचे रंगरंगोटीने सुशोभिकरण करण्यात आले होते. याची दखल घेत करण्यात आलेल्या ग्रामीण मूल्यांकनासाठी केंद्र सरकारकडून १ ते ३१ आॅगस्ट २०१८ या कालावधीत गावांची तपासणी करण्यात आली होती.
पोषण आहार अभियानांतर्गतही गौरव
पोषण आहार अभियानात जिल्ह्णात १ सप्टेंबर पासून राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमुळे नाशिक जिल्हा पहिल्या स्थानावर आहे. त्यामुळे शासनाच्या एकात्मिक बालविकास विभागातर्फे २ आॅक्टोबरला पोषण आहार अभियानाच्या सांगता कार्यक्रमात नाशिकचा प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे. या अभियानात उत्कृष्ट काम केलेल्या एक प्रकल्पाससह एका अंगणवाडी सेविकेचाही यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या सर्व योजनांमध्ये नाशिक जिल्हा उत्कृष्ट कामगिरी करीत आहे. याचे सर्व श्रेय संबंधित अधिकारी व कर्मचाºयांचे आहे. एकत्रित काम केल्यावर यश मिळते हेच या सन्मानातून सिद्ध झाले आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये देशपातळीवर होणारा सन्मान हा नाशिक जिल्ह्णाचा व जिल्ह्णातील नागरिकांचा सन्मान आहे. -डॉ. नरेश गिते, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक.