राष्ट्रध्वजाचा सन्मान यातच आपली शान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 12:27 AM2017-07-22T00:27:27+5:302017-07-22T00:27:46+5:30
नाशिक : स्वतंत्र भारताच्या राष्ट्रीय ध्वजाला स्विकृती मिळून २२ जुलैला ७० वर्ष पूर्ण होत असून येत्या १५ आॅगस्टला देशभरात स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमिवर हा राष्ट्रीय ध्वज मानाने फडकवला जाणार आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : स्वतंत्र भारताच्या राष्ट्रीय ध्वजाला स्विकृती मिळून २२ जुलैला ७० वर्ष पूर्ण होत असून येत्या १५ आॅगस्टला देशभरात स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमिवर हा राष्ट्रीय ध्वज मानाने आणि स्वाभीमाने फडकवला जाणार आहे. डौलाने फडकणाऱ्या आपल्या राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान यातच आपली शान असल्यामुळे सर्वांनी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखावा, असे आवाहन आवाहन विविध सोशल माध्यमांसह वेगवेगळ्या सेवाभावी संस्थांकडून केले जात आहे. राष्ट्रध्वजाचे रक्षण करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. तसेच त्याचा यथोचित सन्मान होणेही आवश्यक आहे. म्हणून प्लॅस्टिकपासून तयार झालेले ध्वज वापरु नये. त्यांचा कागदी ध्वजाप्रमाणे पुननिर्मितीसाठी वापर होत नाही, त्यामुळे राष्ट्रध्वजाच्या सन्मानाचा प्रश्न उद््भवतो. भारतीय राष्ट्रध्वजाच्या संदर्भात भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची जी राष्ट्रध्वज नियमावली आहे तिचे पालन करावे.
राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वजसंहितेच्या (फ्लॅग कोड आॅफ इंडिया) कलम १.२ ते १, ५ मध्ये राष्ट्रध्वजाच्या वापराबाबतच्या तरतूदीनुसार राष्ट्रध्वज वापरावा. प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वज वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये काहीही नमूद नाही. त्याचा विचार करता कोणीही प्लॅस्टिकचा राष्ट्रध्वज वापरु नये. राष्ट्रध्वजाचा अपमान तथा अवमान हा दंडनीय गुन्हा असून राष्ट्रीय सन्मानाचा अवमान प्रतिबंधक कायदा, १९७१ नुसार शिक्षेस पात्र आहे.
राष्ट्रध्वजाचा सन्मान
भारतीय राष्ट्रध्वज हा आपला राष्ट्रीय अभिमान व सार्वभौमत्वाचा संकेत आहे. राष्ट्रध्वज देशातील नागरिकांच्या इच्छा, आकांक्षा व अपेक्षांचे प्रतिक आहे. राष्ट्रध्वजाबाबत असलेल्या २००२ च्या नियमानुसार सामान्य नागरिक, खाजगी संस्था, शैक्षणिक संस्था आदिंनी संथांनी राष्ट्रध्वज फडकविण्यास कुठलेही बंधन नाही. केवळ राष्ट्रध्वज फडकविताना पुढील मार्गदर्शक तत्वानुसार राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणे आवश्यक आहे.राष्ट्रध्वज फडकविण्याबाबत तसेच राष्ट्रध्वज नियमावलीबाबत अधिक माहिती ँ३३स्र://ेँं.ल्ल्रू.्रल्ल/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
योग्य कार्यवाही व्हावी
१५ आॅगस्ट व २६ जानेवारी रोजी मुख्य शासकीय ध्वजारोहन
कार्यक्र म तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्र मादरम्यान विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. त्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्र माच्या ठिकाणी इतरस्त: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करून ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत त्यानुसार त्यांनी कार्यवाही करावी.