नायगावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 09:48 PM2020-01-30T21:48:37+5:302020-01-31T01:03:28+5:30
टी. एस. दिघोळे विद्यालयाचा शासकीय रेखाकला परीक्षेत शंभर टक्के निकाल लागला आहे. विद्यालयाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
नायगाव : येथील टी. एस. दिघोळे विद्यालयाचा शासकीय रेखाकला परीक्षेत शंभर टक्के निकाल लागला आहे. विद्यालयाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
सन २०१९ मध्ये कला संचालनालय मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षेत क्र ां. व्ही. एन. नाईक शिक्षण संस्था संचलित टी. एस. दिघोळे विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. विद्यालयातून १९ विद्यार्थी इंटरमीजिएट परीक्षेला प्रविष्ट झाले होते, त्यापैकी पंधरा विद्यार्थ्यांना अ श्रेणी प्राप्त झाली व चार विद्यार्थी ब श्रेणीत उत्तीर्ण झाले. तसेच एलिमेंट्री परीक्षेला एकूण ४५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यापैकी दोन विद्यार्थी अ श्रेणीत, १० विद्यार्थी ब श्रेणीत व उर्वरित विद्यार्थी क श्रेणीत उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांना कला शिक्षक राजेंद्र निकम यांनी मार्गदर्शन केले.
इंटरमीजिएट परीक्षेतील अ श्रेणीत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी- प्रियंका बहिरट, गायत्री भास्कर, आकांक्षा बोडके, कांचन दिघोळे, आरती जाधव, प्राची जाधव, मृणाली जेजुरकर, समीक्षा जेजुरकर, आदित्य कदम, सायली कदम, अनुष्का कातकाडे, सानिका कातकाडे, समीक्षा ताठे, भाग्यश्री कमोद.