हिसवळ आरोग्य केंद्रात परिचारिकांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 10:03 PM2021-05-12T22:03:50+5:302021-05-13T00:28:30+5:30
मांडवड : जागतिक परिचारिका दिनानिमित्ताने हिसवळ खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिकांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान करण्यात आला.
मांडवड : जागतिक परिचारिका दिनानिमित्ताने हिसवळ खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिकांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान करण्यात आला.
ज्या परिचारिकांनी आपली व कुटुंबाची पर्वा न करता कोरोनाच्या महामारी स्वतःला रुग्णसेवेसाठी वाहून घेतले व एक देवदूत म्हणून अनेक दिवसापासून या भयानक परिस्थितीतसुद्धा रुग्णांची सेवा केली. अशा परिचारिकांचा ए.जी. घोडके, एस. जी. बागुल, एस. एम. केदारे, डी. एस. गोसावी आदींनी केलेल्या या सन्मानपूर्वक कार्याची दखल घेऊन हिसवळ खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्रात सरपंच कैलास फुलमाळी, उपसरपंच संजय आहेर यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रमाणपत्र, सॅनिटायझर, मास्क, गुलाबाची फुले, पेन आदी साहित्यांची किट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी आरोग्य अधिकारी डॉ. संतोष जगताप, ग्रामसेवक ईश्वर गायकवाड, टी. बी. दंवगे, आरोग्य विभागाचे कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, आशासेविका आदी उपस्थित होते.
(१२ हिसवळ)