निस्वार्थ पत्रकारिता सेवाकर्माचा सन्मान : श्रीकांत पुर्णपात्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 07:29 PM2019-01-06T19:29:26+5:302019-01-06T19:34:36+5:30

मराठी पत्रकारितेतील ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती रविवारी (दि.६) सर्वत्र  पत्रकारिता दिन म्हणून साजरी करण्यात आली.

Honor of selfless journalism service: Srikant Paranpatre | निस्वार्थ पत्रकारिता सेवाकर्माचा सन्मान : श्रीकांत पुर्णपात्रे

निस्वार्थ पत्रकारिता सेवाकर्माचा सन्मान : श्रीकांत पुर्णपात्रे

Next
ठळक मुद्देपत्रकारिता म्हटलं की लोकशाही जीवंत ठेवत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण‘जीवन संजीवनी’चे प्रात्याक्षिकएकूण १८ पत्रकारांना सन्मानित करण्यात आले

नाशिक :पत्रकारिता म्हटलं की लोकशाही जीवंत ठेवत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण आलेच. सत्त्यनिष्ठा या एकमेव निकषावर आधारित  व्रतस्थ सेवाकर्माचे शिवधनुष्य पेलत अनेकदा पाणउतारा सहन करत आपले कर्तव्य चोखपणे बजावणाऱ्या पत्रकारांच्या निस्वार्थ सेवाकार्याचा वैद्यकिय पेशा जोपासणा-या सेवाव्रतींकडून करण्यात आलेला गौरव आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ डॉक्टर कवी श्रीकांत पुर्णपात्रे यांनी केले.
मराठी पत्रकारितेतील ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती रविवारी (दि.६) सर्वत्र  पत्रकारिता दिन म्हणून साजरी करण्यात आली. या दिनाचे औचित्य साधून इंडियन मेडीकल असोसिएशन नाशिक शाखेच्या वतीने (आयएमए) शहरातील प्रत्येक दैनिकामधील दोन पत्रकार असे एकूण १८ पत्रकारांना सन्मानित करण्यात आले. या सन्मान सोहळ्याला प्रमुख पाहूणे म्हणून पुर्णपात्रे उपस्थित होते. यावेळी व्यासपिठावर ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. निवेदिता पवार, भुलतज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्ष डॉ. सरला सोहंदानी, आयएमएचे अध्यक्ष डॉ. आवेश पलोड, सचिव डॉ. नितीन चिताळकर उपस्थित होते.
यावेळी पुर्णपात्रे म्हणाले, पत्रकारिता आणि वैद्यकिय सेवाव्रत जपणा-या व्रतस्थींना दैनंदिन सेवाकार्य बजावताना येणा-या अडचणी व आव्हानांचा सामना करावाच लागतो. आपल्या स्वत:ची कुटुंबाची पर्वा न करता ही मंडळी केवळ जनतेची पर्वा करत आपले सेवाकार्य पार पाडत असतात.
वैद्यकीय क्षेत्रासाठीची कडक धोरणे, टीकाटिपण्णी, रोष, अवहेलनांसारख्या संकटांना या क्षेत्रात काम करणारे पेशाने डॉक्टर असलेल्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच अवमान, अवहेलना, पाणउतारा एवढ्यावरच न थांबता थेट पत्रकारांसह डॉक्टरांनाही अनेकदा हल्ल्यांना सामोरे जावे लागते, हे समाजाचं दुर्दैवच म्हणावे लागेल, कारण हे दोन्ही घटक केवळ समाजाच्या उन्नतीसाठी सदैव कार्यरत असतात, हे विसरून चालणार नाही, असेही पुर्णपात्रे यांनी यावेळी नमुद केले. त्यांनी भाषणाच्या सुरूवातीला आपल्या कवीमनाच्या गुलदस्त्यातून खुमासदार शैलीत उधळलेल्या प्रासंगिक विनोदांनी सगळ्यांचा उत्साह द्विगुणित केला.
दरम्यान, डॉ. निवेदिता पवार यांनी उपस्थित पत्रकारांना शुभेच्छा देत स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देऊन सुदृढ निरामय शरीर ठेवत समाजदेखील सक्षम व निरामय बनविण्याचा प्रयत्न अविरतपणे करत रहावा, असा मौलिक सल्ला दिला.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दैनिक ‘लोकमत’चे प्रतिनिधी विजय मोरे, अझहर शेख यांच्यासह पत्रकार आसिफ सय्यद, विजय गिते, प्रशांत कोतकर, संकेत शुक्ल, सय्यद चांदभाई, अजय भोसले, नवनाथ वाघचौरे, गणेश डेमसे, गौरव अहिरे, गौरव जोशी, अरुण मलाणी, रामदास नागवंशी यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक डॉ. आवेश पलोड यांनी केले तर सुत्रसंचालन स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. माधवी गोरे-मुठाळ यांनी केले व आभार डॉ. किरण शिंदे यांनी मानले. याप्रसंगी डॉ. दीपा जोशी, डॉ. गौरी कुलकर्णी, डॉ. अभिजीत पाटील, डॉ. पंकज भदाणे यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘जीवन संजीवनी’चे प्रात्याक्षिक
भुलतज्ज्ञ संघटनेच्या वतीने ‘जीवन संजीवनी’ अर्थात सीपीआर प्रक्रियेचे प्रात्याक्षिक यावेळी दाखविण्यात आले. तसेच काही पत्रकारांनीदेखील या प्रात्याक्षिकाचा अनुभव घेतला. गर्दीच्या ठिकाणी अचानकपणे हृदयविकाराचा झटका येऊन किंवा मेंदूविकाराचा झटका येऊन एखादी व्यक्ती कोसळल्यास त्याच्या हृदयावर सतत नऊ ते दहा मिनिटे विशिष्ट पध्दतीने दाब देऊन बंद पडलेली रक्तभिसरण प्रक्रिया पुन्हा कार्यान्वित करण्यासाठीचा प्रयत्न रुग्णवाहिका येईपर्यंत करत राहणे गरजेचे ठरते. कारण हा त्या रुग्णासाठीचा ‘गोल्डन टाईम’ असतो. हृदयाकडून मेंदूला अशास्थितीत रक्तपुरवठा पुर्ववत होऊ शकल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता कमी होते, असे सोहंदानी यांनी यावेळी सांगितले. ही प्रक्रिया अपघातसमयी कोसळून जखमी झालेल्या अपघातग्रस्त व्यक्तीसाठीदेखील उपयुक्त ठरते. त्यामुळे अपघातात कोठेही मार लागल्यास रक्तस्त्राव होत असल्यास त्याची चिंता न बाळगता ‘सीपीआर’द्वारे जीवन संजीवनीचा प्रयत्न सर्वसामान्यांनी करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

 

Web Title: Honor of selfless journalism service: Srikant Paranpatre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.