इनरव्हील क्लबतर्फे आदर्श ग्रामसेवक सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 05:25 PM2020-02-04T17:25:21+5:302020-02-04T17:25:37+5:30
सटाणा : आमदारांसह मान्यवरांची उपस्थिती
सटाणा : येथील इनरव्हील क्लबच्यावतीने आदर्श ग्रामसेवकांना सन्मानित करण्यात आले. गावाच्या विकासात ग्रामसेवकाची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याने तो जिल्हा परिषदेच्या विकासाचा प्रमुख कणा आहे. आपण जनतेचे सेवक असून जनता आपल्याकडून अनेक अपेक्षा ठेवून असते. या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी सर्व ग्रामसेवकांनी प्रामाणिक प्रयत्न करावे, असे आवाहन बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी यावेळी बोलताना केले.
लाडशाखीय वाणी मंगल कार्यालयात आयोजित सोहळ्यात ग्रामसेवकांना आमदार बोरसे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श गाव किकवारीचे माजी सरपंच केदा काकुळते, नगराध्यक्ष सुनिल मोरे, गटविकास अधिकारी पी.एस.कोल्हे,सहाय्यक गटविकास अधिकारी काथेपुरी, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक सावंत, क्लबच्या अध्यक्षा स्मिता येवला, संस्थापक अध्यक्षा रूपाली कोठावदे, विस्तार अधिकारी व्ही.पी.जाधव, नितिन देशमुख, पी.सी.नेरकर, भैय्या सावंत आदि उपस्थित होते. क्लबच्या अध्यक्षा स्मिता येवला यांनी प्रास्ताविकात वर्षभरात राबविलेल्या विविध उपक्र मांची माहिती दिली. नगराध्यक्ष मोरे, केदा काकुळते, कोल्हे,रूपाली कोठावदे, के.बी.इंगळे आदींची यावेळी भाषणे झाली.
कार्यक्र मास साधना पाटील, नयना कोठावदे, संगीता खानकरी, सुजाता पाठक, योगिता देवरे, पूनम अंधारे,रूपाली पंडित,श्रीधर कोठावदे, जगदीश मुंडावरे,सुनील येवला, साहेबराव बच्छाव, डी.टी.देवरे,साहेबराव देवरे, पुष्कर देवरे, नाना मोरकर, नंदिकशोर शेवाळे, राजेंद्र येवला, डॉ.अमरनाथ पवार, योगेश अमृतकार, राजेंद्र खानकरी, संदीप पवार, दिनेश सोनवणे आदींसह इनरव्हील क्लबच्या सर्व सदस्या व नागरिक उपस्थित होते. पल्लवी सोनवणे व यशवंत धोंडगे यांनी सूत्रसंचलन केले तर सचिव रूपाली जाधव यांनी आभार मानले.
...यांचा झाला सन्मान
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भाऊसाहेब ठोके (लखमापुर),के.बी.इंगळे (नामपुर), जाई चौरे (दसवेल), नूतन देवरे (दोधेश्वर व कोळीपाडा), स्वाती देवरे (दहिंदुले व रातीर), विद्या बेडीस (क-हे), श्रद्धा सूर्यवंशी (पिंपळदर), वंदना लांडगे (भिलदर), उज्वला कडवे (मोरकुरे), संदीप खैरनार (अंतापूर), ललिता भामरे (कातरवेल), यशवंत चौरे (किकवारी), स्वप्नील ठोके (ताहाराबाद), राजेंद्र बत्तीसे (कपालेश्वर), पंकज पवार (मुंगसे व भाक्षी), योगेश भामरे (पिंपळकोठे), जितेंद्र निकुंभ (रामतीर), अमोल देवरे (निरपुर व खमताने),बळीराम सोनवणे (बोरदैवत), सचिन कापडणीस (ब्राह्मणपाडे), योगेश सूर्यवंशी (औंदाणे)