आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडू सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 12:45 AM2017-09-04T00:45:59+5:302017-09-04T00:46:10+5:30

नाशिकमध्ये भारतीय क्रीडा प्राधिकरणाची पुढील पाच ते सहा महिन्यांत स्थापना करण्याच्या हेतूने शासन दरबारी प्रयत्न सुरू असून या प्राधिकरणासाठी शहरात जमीन उपलब्ध न झाल्यास शहराच्या जवळपास जमीन उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी. यांनी रविवारी (दि. ३) नाशिक जिल्हा अ‍ॅथलेटिक असोसिएशन यांच्यातर्फे आयोजित राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करणाºया खेळाडूंच्या सत्कार समारंभाप्रसंगी व्यक्त केले.

Honored players participating in the international tournament | आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडू सन्मानित

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडू सन्मानित

Next

नाशिक : नाशिकमध्ये भारतीय क्रीडा प्राधिकरणाची पुढील पाच ते सहा महिन्यांत स्थापना करण्याच्या हेतूने शासन दरबारी प्रयत्न सुरू असून या प्राधिकरणासाठी शहरात जमीन उपलब्ध न झाल्यास शहराच्या जवळपास जमीन उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी. यांनी रविवारी (दि. ३) नाशिक जिल्हा अ‍ॅथलेटिक असोसिएशन यांच्यातर्फे आयोजित राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करणाºया खेळाडूंच्या सत्कार समारंभाप्रसंगी व्यक्त केले.
एका हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात चीन येथे झालेल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी स्पर्धेत विशेष कामगिरी केलेल्या खेळाडूंसह इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. यामध्ये संजीवनी जाधव, किसन तडवी, रणजीत पटेल, कांतीलाल कुंभार, पूनम सोनवणे, ताई बामणे, दुर्गा देवरे आणि मोनिका आथरे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या समारंभाप्रसंगी आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, डॉ. राहुल आहेर यांनी आपल्या मनोगतातून नाशिकच्या धावपटूंना शुभेच्छा देताना नाशिकचे नाव अ‍ॅथलेटिक क्रीडा प्रकारात उंचावल्याचा अभिमान असल्याचे सांगितले तसेच आगामी स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट करण्याचेही आवाहन केले. प्रशिक्षक विजेंदर सिंग यांनी विविध स्पर्धांमध्ये नाशिकच्या खे्रळाडूंनी केलेल्या कामगिरीची तसेच आगामी काळात होणाºया स्पर्धांमध्ये नाशिकचे खेळाडू सहभागी होणार असल्याची माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर खासदार हेमंत गोडसे, डॉ. प्रदीप पवार, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, प्रशिक्षक विजेंदर सिंग, व्ही. व्ही सूर्यवंशी, आमदार राहुल आहेर, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, अ‍ॅड. जयंत जायभावे, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, मोनिका राऊत उपस्थित होते.

Web Title: Honored players participating in the international tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.