धनगर समाजातील मान्यवरांचा कार्यरत्न पुरस्कार देऊन गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2021 22:25 IST2021-10-12T22:24:36+5:302021-10-12T22:25:32+5:30
गोंदे दुमाला : नाशिक पुण्यश्लोक बहुद्देशीय संस्था, महाराष्ट्र राज्य व यशवंत प्रहार संघटना नाशिक जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच धनगर समाजातील विविध मान्यवरांचा ह्य कार्यरत्न ह्ण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

कार्यरत्न पुरस्कारार्थी समवेत मंगेश मरकड, यतीन कदम, डॉ. तुषार चिंचोले, भाऊसाहेब ओहळ, चिमाजी भांड व इतर पदाधिकारी.
गोंदे दुमाला : नाशिक पुण्यश्लोक बहुद्देशीय संस्था, महाराष्ट्र राज्य व यशवंत प्रहार संघटना नाशिक जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच धनगर समाजातील विविध मान्यवरांचा ह्य कार्यरत्न ह्ण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम, धनगर समाज संघर्ष समितीचे डॉ. तुषार चिंचोले, विजय कारे, पुण्यश्लोक बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष व कार्यक्रमाचे संयोजक भाऊसाहेब ओहळ व ज्येष्ठ मार्गदर्शक चिमाजी भांड यांच्या प्रमुख उपस्थितीत सोनगाव तालुका निफाड याठिकाणी हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष उत्तम पाबळे उपाध्यक्ष अशोक चिखले, कार्याध्यक्ष कैलास आडभाई, खजिनदार संतोष पल्हाळ, गोरख जाधव, संजय बुचुडे, संदीप ओहळ, वैभव जाधव, देविदास बुचुडे, संतोष भादेकर, सुदर्शन गांडूळे, यश लिटे, हर्षद बस्ते, अविनाश गोराणे, आबा कांदळकर यांनी परिश्रम घेतले.