मल्हार हिल कॅम्पसमध्ये महिला शिक्षकांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:17 AM2021-03-09T04:17:07+5:302021-03-09T04:17:07+5:30
या प्रसंगी विद्यालयातील सर्व महिला शिक्षकांचा पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा विकास अधिकारी सुरेश येवला ...
या प्रसंगी विद्यालयातील सर्व महिला शिक्षकांचा पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा विकास अधिकारी सुरेश येवला होते. त्यांनी आदर्श माता सन्मान, आईची दैनंदिनी आदींसारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक करत प्रत्येक मातेने महिलांचा आदर करणारा भावी नागरिक घडवावा, असा संदेश दिला.
मुख्याध्यापक पंकज दातरे यांनी बेटी बचाओ, बेटी पढाओ, हा नारा नुसता हवेत नको तर प्रत्येकाच्या अंतरंगात असणे गरजेचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र कोठावदे, किरण सोनवणे,नंदकिशोर शेवाळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शेखर अहिरे, ज्ञानेश्वर सोळूंके, अमोल गातवे, चेतना येवला, स्वाती दातरे, सारिका शिंदे, विशाखा सोनवणे, धनश्री ठोके, पवन नाडेकर आदींसह शिक्षक व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले. हर्षली मोरे यांनी सूत्रसंचालन केले तर सुजाता पाटील यांनी आभार मानले.
फाेटो- ०८सटाणा महिला
भाक्षी येथील मल्हार हिल कॅम्पसमध्ये आयोजित कार्यक्रमप्रसंगी उपस्थित महिला व विद्यार्थिनी.
===Photopath===
080321\08nsk_10_08032021_13.jpg
===Caption===
फाेटो- ०८सटाणा महिला भाक्षी येथील मल्हार हिल कॅम्पसमध्ये आयोजित कायक्रमप्रसंगी उपस्थित महिला व विद्यार्थिनी.