अमरधाममधील कोविड योद्ध्यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:12 AM2021-07-15T04:12:28+5:302021-07-15T04:12:28+5:30
नाशिक : कोरोना महामारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जीवाची पर्वा न करता अमरधाममध्ये रात्रंदिवस मृतांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना छत्रपती ...
नाशिक : कोरोना महामारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जीवाची पर्वा न करता अमरधाममध्ये रात्रंदिवस मृतांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना छत्रपती मराठा साम्राज्य ऑर्गनायझेशनच्यावतीने सन्मान करण्यात आला.
कोरेानाच्या काळात बाधितांपासून दूर जाणाऱ्या नातेवाईकांचा अनुभव असताना अशा काळात मयतांवरील अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे योगदान योद्धासारखेच असल्याने त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आल्याचे ऑर्गनायझेशनचे संचालक धनराज भोसले यांनी सांगितले. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या कर्मचाऱ्यांना लक्ष फार्माचे संचालक नीरज खालकर, संजीवनी आयुर्वेद संचालक प्रशांत पुरकर, शगुन मेडिकलचे संचालक तुषार पवार यांच्या सहकार्याने कोविड सुरक्षा साधने कर्मचाऱ्यांना प्रदान करण्यात आले.
पंचवटी अमरधाममधील सुनीता राजेंद्र पाटील यांच्या सेवेची दखल घेत संगीता मंडलिक यांनी त्यांना साडी भेट दिली. नाशिक अमरधाममधील १८ कर्मचारी, जुने नाशिक अमरधाममधील १३ कर्मचारी अशा एकूण ३१ कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी धनराज भोसले, महेश गव्हाणे, सखाराम बाबर, भागवत भदाणे, डॉ. कल्याण शिंदे, यतीन मंडलिक, उज्ज्वल पाटील, प्रदीप सोनावणे, उमेश चौधरी, मुकूल भेासले, श्रीधर गाडे, शिवाजी यादव, शुभम शेवाळे, नीरज खालकर, प्रशांत पुरकर, पुषार पवार, दीपक वाघ आदी उपस्थित होते.