परिचारिकांचा महापौरांच्या हस्ते सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:13 AM2021-05-15T04:13:50+5:302021-05-15T04:13:50+5:30
कोरोना संसर्गाने महाभयंकर रूप धारण केलेले असून, या परिस्थितीत रुग्णांना सेवा देणारे डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय, तसेच इतर घटक हे ...
कोरोना संसर्गाने महाभयंकर रूप धारण केलेले असून, या परिस्थितीत रुग्णांना सेवा देणारे डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय, तसेच इतर घटक हे अतिशय जबाबदारीने डॉक्टरांबरोबर परिचारिका या फ्रन्टलाइन सोल्जर म्हणून कामकाज करीत आहेत. नाशिक शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वर्षभरापासून सुरू असून, रुग्णांना अव्याहतपणे सेवा देणाऱ्या नाशिक शहरातील महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमधील व खासगी हॉस्पिटलमधील परिचारिका या अव्याहतपणे जिवावर उदार होऊन सेवा देत आहेत. त्यामुळे महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी झाकीर हुसेन हॉस्पिटलमधील सेवा देणाऱ्या कल्पना सनान्से, अलका जमदाडे आणि नानस्कर यांचा पुष्पगुच्छ देऊन रामायण निवासस्थान येथे सत्कार केला. यापुढेही परिचारिका म्हणून अव्याहतपणे सेवा द्यावी, असे सांगून महापौरांनी त्यांच्या कार्याचाही गौरव केला.
छायाचित्र एनएसके एडीटवर