ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात परिचारिकांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:13 AM2021-05-17T04:13:28+5:302021-05-17T04:13:28+5:30
गेल्या वर्षीपासून कोरोनाच्या संकट काळात आरोग्यसेवक व सेविका यांनी जिवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली आहे. त्यामुळे सामाजिक ...
गेल्या वर्षीपासून कोरोनाच्या संकट काळात आरोग्यसेवक व सेविका यांनी जिवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली आहे. त्यामुळे सामाजिक बांधीलकी म्हणून सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात परिचरिकांचा सत्कार करण्यात आला. तसेच कर्मचाऱ्यांसाठी पीपीई किट, हँड ग्लोव्हज व अत्यावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ वर्षा लहाडे, दापूरकर रोड लाइनचे संचालक संदीप आव्हाड, राजू आव्हाड, योगेश आव्हाड, नवनाथ आव्हाड, भगवान गारे, समाधान आव्हाड, ज्ञानेश्वर काकड, पांडुरंग आव्हाड व गोरेगाव फिल्म सिटी मित्रमंडळाचे मुकुंद डोळसे तसेच सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील प्रियांका डफेदार, मनीषा आव्हाड, सुवर्ण गीते, स्वराली कालेकर, क्षितिजा सोनवणे, सीमा भावसार, संगीता शिरसाठ, दीपाली कोठुरकर, मीना सोनवणे, योगीता सोनवणे, कविता लांडगे, वैशाली बिंड, मनीषा शिंदे, पूनम पाचोरे, सविता जाधव, नाना शिंदे, शाहरूख शेख, देवेंद्र सोनवणे, रोहित काळे, गणेश झुटे आणि कर्मचारी उपस्थित होते.
फोटो ओळी- १६ सिन्नर १
सिन्नर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त रुग्णालयातील परिचरिकांचा करण्यात आलेला गौरव.