नाशिकच्या शिक्षकांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:25 PM2021-02-06T17:25:34+5:302021-02-06T17:26:45+5:30
येवला : औरंगाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय शिक्षक गौरव पुरस्कार सोहळ्यात नाशिक येथील शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
येवला : औरंगाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय शिक्षक गौरव पुरस्कार सोहळ्यात नाशिक येथील शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
औरंगाबाद येथील तापडिया नाट्यमंदिर येथे अॅप लॉन्च व राज्यस्तरीय शिक्षक गौरव पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चु कडू, औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी मंगेशकुमार गोंदवले, शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जयस्वाल आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विजया चतुर, माधुरी पाटील, गोकुळ वाघ, गजानन देवकते, राहुल धुमाळ, बापू चतुर, दिलीप गोसावी, वैशाली सायाळेकर, दत्ता उगले, बालाजी नाईकवाडे, पल्लवी भालेराव, सविता मोरे, दिपाली पवार, राहूल धुमाल, रविंद्र शेळके, प्रशांत भोसले या शिक्षकांचा मान्यवरांचे हस्ते सन्मान करण्यात आला.
संपूर्ण जगावर ओढवलेल्या कोरोना या महामारी मुळे जणू जग थांबूनच गेले होते. पण त्याच काळात घरातच सुरू झाली ऑनलाइन शाळा आयोजित झेडपी लाईव्ह एज्युकेशन या उपक्रमाअंतर्गत मुले शाळाबाह्य होऊ नये व ती कायमस्वरूपी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहावी या साठी घरातूनच मुलांसाठी रोज शैक्षणिक पाठांचे लाईव्ह सादरीकरण केले जात होते. त्यात राज्यातील अनेक शिक्षकांसोबत नाशिकच्याही उपक्रमशील शिक्षकांनी भाग घेतला होता. त्याची दखल घेत त्यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.