तीन पिढ्यांच्या महिलांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 11:58 PM2020-03-06T23:58:41+5:302020-03-06T23:59:03+5:30
दिवसेंदिवस प्रगत होणाºया तंत्रज्ञानाच्या जगात संपूर्ण जग जवळ येत असले तरी अनेक कुु टुंब मात्र विभक्त होऊन दूर जात असताना नाशिकमध्ये संयुक्त कुटुंबपद्धतीचा प्रचार-प्रसार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशाच प्रयत्नांतून नाशिकमध्ये एका छताखाली संयुक्त कुटुंबात राहणाºया तीन पिढ्यांतील महिलांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.
नाशिक : दिवसेंदिवस प्रगत होणाºया तंत्रज्ञानाच्या जगात संपूर्ण जग जवळ येत असले तरी अनेक कुु टुंब मात्र विभक्त होऊन दूर जात असताना नाशिकमध्ये संयुक्त कुटुंबपद्धतीचा प्रचार-प्रसार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशाच प्रयत्नांतून नाशिकमध्ये एका छताखाली संयुक्त कुटुंबात राहणाºया तीन पिढ्यांतील महिलांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.
पंडित कॉलनीतील माहेश्वरी मंगल कार्यालयात गुुरु वारी (दि.५) संस्थेच्या अध्यक्ष रजनी जातेगावकर यांच्या अध्यक्षतेत हा सत्कार सोहळा रंगला. व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या म्हणून हास्य क्लबच्या सुषमा दुग्गड, विमल कलंत्री, लीला तांबट, नयना भुतडा, रंजना तांबट, उषा जातेगावकर, सुरेखा तांबट आदी उपस्थित होत्या.
प्रास्ताविक रजनी जातेगावकर यांनी केले. सूत्रसंचालन हेमा झवर यांनी केले. सुरेखा तांबट यांनी आभार मानले. यावेळी राजश्री चांडक व मनीषा शर्मा उपस्थित होत्या.
स्मृतिचिन्ह देऊन सत्कार
एकाच छताखाली राहून कुटुंबाचा गाडा यशस्वीपणे चालविणाºया आजीसासू, सासू व नातसून अशा तीन पिढींतील महिलांचा यावेळी स्मृतिचिन्ह देऊन सत्कार, सन्मान करण्यात आला. यात सात पिढ्या एकत्र असलेल्या मणियार कुटुंबातील कमळाबाई, शशिकला व अनुजा मणियार यांच्यासह धूत, नावंदर, मालपाणी, बाफ ना, खिंवसरा, काळे, नागरे, कंसारा, गज्जर, तांबट, गांगुर्डे, रामदासी, पवार राठी, जाजू, दिंडे आदी २० कुटुंबांतील तीन पिढ्यांच्या महिलांना यावेळी सन्मानित करण्यात आले.