सिन्नर नगर परिषदेत महिलांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:15 AM2021-03-10T04:15:27+5:302021-03-10T04:15:27+5:30
बांधकाम अभियंता मयूरी नवले, लेखापाल विष्णू हाडके, शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला दिनाचा कार्यक्रम घेण्यात ...
बांधकाम अभियंता मयूरी नवले, लेखापाल विष्णू हाडके, शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. बांधकाम अभियंता मयूरी नवले यांचे हस्ते यावेळी उपस्थित सर्व महिलांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत दिल्या जाणाऱ्या फिरता निधीचा वापर गटांतर्गत कर्ज देवाणघेवाण करण्यासाठी करावा व आपल्या परिसरातील विविध सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक वस्ती स्तरीय संघाने पुढाकार घ्यावा, असे मत शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव यांनी व्यक्त केले. यावेळी प्रीती लोंढे, अनुराधा लोंढे, रोहिणी सोनवणे, प्रीती लहामगे, निलोफर सय्यद, प्रतिभा भाटजिरे, कल्पना भाटजिरे, ज्योती भाटजिरे, सुनीता गायकवाड, सुरेखा भालेराव, शहिनाज शेख, शाहीन मणियार, लता सोनवणे, शीतल जाधव, मनीषा कोकाटे, शालिनी जगताप, कविता सोळंकी, पायाल दुबे आदीसह महिला उपस्थित होत्या.
इन्फो
फिरत्या निधीचे वितरण
नगराध्यक्ष किरण डगळे, मुख्याधिकारी संजय केदार यांचे शुभेच्छासह दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापन झालेल्या आनंदी वस्ती स्तरीय संघास ५० हजार रुपयांचा फिरता निधी वितरण करण्यात आल्याचे पत्र लेखापाल विष्णू हाडके यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.