जुन्नरे हायस्कूलमध्ये गुणवंतांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 01:36 AM2018-08-15T01:36:48+5:302018-08-15T01:37:06+5:30

नशिक एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती रंगूबाई जुन्नरे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेतील देदीप्यमान यशाची परंपरा कायम ठेवत इयत्ता पाचवीच्या ७ व इयत्ता आठवीच्या १२ अशा एकूण १९ विद्यार्थ्यांनी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. या विद्यार्थ्यांचा शाळेत मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़

 Honors of quality at Junnare High School | जुन्नरे हायस्कूलमध्ये गुणवंतांचा सत्कार

जुन्नरे हायस्कूलमध्ये गुणवंतांचा सत्कार

Next

नाशिक : नशिक एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती रंगूबाई जुन्नरे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेतील देदीप्यमान यशाची परंपरा कायम ठेवत इयत्ता पाचवीच्या ७ व इयत्ता आठवीच्या १२ अशा एकूण १९ विद्यार्थ्यांनी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. या विद्यार्थ्यांचा शाळेत मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़  महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागातर्फे या शिष्यवृत्ती परीक्षांचे आयोजन करण्यात येते. बौद्धिक क्षमतांची कसोटी पाहणाऱ्या या परीक्षेत शाळेतर्फेइयत्ता पाचवीतील ९५, तर इयत्ता आठवीतील ९० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इ.५वी) कृष्णा भोकरे जिल्ह्यात २४वा, वेदांत देवरे ४५वा, तन्मय सानप ८३वा, रोहित चव्हाण ११४ वा, वरु णी पुराणिक १४१ वी, समृद्धी नीळकंठ २०४ वी, हिमांक्षी गोखले २७१ वी यांनी तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इ.८वी) श्रेयस कुलकर्णी जिल्ह्यात १ ला, मेघा पाटील ५ वी, निखिल सोलंकी २०वा, कौशल मुळे ८१ वा, रिद्धी कुलकर्णी ९४वी, वेद वाघुलदे १५३वा, श्रावणी कुलकर्णी १५५ वी, आदित्य बैरागी १७६ वा, मंजिरी बनकर १८४ वी, वरुण जगताप १८९ वा, स्नेहा साखरे १९२ वी, प्रथमेश तांबे २६२वा या विद्यार्थ्यांनी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत येण्याचा बहुमान पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांचा कोठारी फाउंडेशनचे डॉ. संदीप देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नशिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर, उपाध्यक्ष प्रा. दिलीप फडके, राजेंद्र निकम, दिलीप आहिरे, मुख्याध्यापिका नंदा पेटकर तसेच विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थ्यांना योगीता भोकरे, उज्ज्वला पाटील, अमृता कालेकर, मनीषा कुलकर्णी या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title:  Honors of quality at Junnare High School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.