नाशकात वाढत्या थंडीसोबत रंगतायेत हुरडा पार्टीचे बेत, रब्बी हंगामात ज्वारीसोबतच गहू, हरभरा पिकांचाही होतो हुरडा

By नामदेव भोर | Published: December 11, 2017 01:56 PM2017-12-11T13:56:37+5:302017-12-11T14:37:59+5:30

नाशिक परिसरातील शेतशिवारासह आसपासच्या कृषी पर्यटन केंद्रांवर रंगू लागले आहेत. वाढत्या थंडीसोबतच पाहूण्यांसाठी हुरड्याच्या खास बेतापासून कृषी पर्यटन केंद्रांवरील हुरडा पार्टीपर्यंत ठिकठिकाणी हुरड्याची रंगत वाढत असून या माध्यमातून कृषी पर्यटन व्यवसायालाही चालना मिळत आहे.

Hooda Party's plan to colorize with the growing cold in the Nashik, along with jawar in rabi season, wheat and gram crops also became hurda | नाशकात वाढत्या थंडीसोबत रंगतायेत हुरडा पार्टीचे बेत, रब्बी हंगामात ज्वारीसोबतच गहू, हरभरा पिकांचाही होतो हुरडा

नाशकात वाढत्या थंडीसोबत रंगतायेत हुरडा पार्टीचे बेत, रब्बी हंगामात ज्वारीसोबतच गहू, हरभरा पिकांचाही होतो हुरडा

Next
ठळक मुद्देनाशकात खास हुर्ड्यासाठी ज्वारीचे पीक घेणारे शेतकरीवाढत्या थंडीसोबतच पाहूण्यांसाठी हुरड्याच्या खास बेतशेतकऱ्यांकडून ज्वारी विकत घेऊन हुरडय़ाचे नियोजन गरमगरम हुरडा गुळासोबत चाखण्यासाठी खवय्ये जागवताय रात्र

नाशिक : गोवऱ्यांची, लाकडांची पेटलेली शेकोटी, त्यातील निखाऱ्यांवर खरपूस भाजलेली ज्वारीची कोवळी दाणेदार कणसे आणि मग हातावर किंवा दगडावर कणीस घुसळल्यानंतर तयार होणारा गरमगरम हुरडा गुळासोबत चाखत जागवलेली रात्र, असे चित्र नाशिक परिसरातील शेतशिवारासह आसपासच्या कृषी पर्यटन केंद्रांवर रंगू लागले आहेत. वाढत्या थंडीसोबतच पाहूण्यांसाठी हुरड्याच्या खास बेतापासून कृषी पर्यटन केंद्रांवरील हुरडा पार्टीपर्यंत ठिकठिकाणी हुरड्याची रंगत वाढत असून या माध्यमातून कृषी पर्यटन व्यवसायालाही चालना मिळत आहे.
ज्वारीचे पीक प्रामुख्याने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात घेतले जात असले तरी नाशकातील थंडीच्या पार्श्वभूमीवर परिसारतील कृषी शिवारासह विविध कृषी पर्यटन केंद्रांवर खास हुर्ड्यासाठी ज्वारीचे पीक घेणारे शेतकरी आहे. सध्या रब्बी ज्वारीचे पिक अंतिम अवस्थेत आहे. कणसात दाणे भरण्यास सुरवात झाल्यानंतर दुधाळ दाणे हिरवे होवून भरु लागले की त्याला ज्वारी हुरड्यात आली असे म्हणतात. दुधाळ दाणे ते निब्बर दाणे या दोन्हींच्या मधली थोडी कच्चीपक्की अशी ही अवस्था असते. या अवस्थेतील टपोरी कणसे हुरड्यासाठी निवडली जातात. ताटावरुन कणसे खुडताना त्यांचा दांडा लांब ठेवला जातो. लांब दांड्यामुळे कणीस विस्तवात भाजायला सोपे जाते. हुरड्यासाठी विशिष्ट पद्धतीने शेकोटी तयार केली जाते. वाऱ्यापासून संरक्षण आणि निखारे जास्त वेळ फुलत रहावेत म्हणून शेतातच खड्डा खणून त्यात गोवऱ्या पेटविल्या जातात. अनेक ठिकाणी गोवऱ्यांसोबत लाकडांचाही वापर केला जातो. जाळ संपल्यानंतर निखाऱ्यात ही कणसे खुपसण्यात येतात. तर काही ठिकाणी कोळशाच्या शेगडय़ांचाही वापर हुरडय़ासाठी वापर केला जातो.

चारही बाजूने चांगला ताव बसण्यासाठी कणसे वेळोवेळी फिरवतात आणि मग चांगली खरपूस भाजलेल्या कणसांचे दाणे म्हणजेच हुरडा काढण्यासाठी ती तळहात किंवा दगडावर रगडतात. दाण्यांवरील कण्या निट निघाल्या नाहीत तर घशाला त्रस देतात. यामुळे कणसे रगडण्याची कला हुरडा तयार करण्यात सर्वाधिक महत्वाची समजली जाते. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रासह आता नाशिकमध्येही विविध ठिकाणी हुरडा पार्टीची परंपरा रुजत असून अनेकांनी या हुरडा पाटर्य़ाना व्यवसायिक स्वरुपही दिले आहे.
 

गहू, हरभराऱ्याचाही हुरडा
रब्बी हंगामाच्या ज्वारीबरोबरच गहू व हरभरा या दोन्ही पिकांचाही हुरडा केला जातो. वेगवेगळ्या ठिकाणी त्यास वेगवेगळी नावे असली तरी सर्वसाधारणपणे गव्हाच्या हुरड्याला ओंब्यांचा हुरडा व हरभऱ्याच्या हुरड्याला हुळा म्हटले जाते. बाजरीच्या हुरड्याला निंबूर हे खास नाव आहे. अनेक ठिकाणी हरभऱ्याचा हुळा करुन वर्षभर खाण्यासाठी साठवून ठेवला जातो. ज्वारीबरोबरच सध्या अनेक ठिकाणी हरभरा ही हुरड्याच्या अवस्थेत असून गव्हाची ओंबी भरण्यासही सुरवात झाली आहे. त्यामुळे येत्या पंधरा दिवसात संक्रातीपूर्वी हुरडा पार्ट्यांमध्ये ओंब्यांच्याही समावेश होऊ लागणार आहे. त्यामुळे हुर्डा पाटर्य़ाचा हा हंगाम किमान दीड ते दोन महिने तरी चांगलाच रंगणार अलल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

हुरड्याचाही बदलतोय ट्रेन्ड
गेल्या आठ ते दहा वर्षात अनेक ठिकाणच्या पारंपरिक ज्वारीच्या पट्ट्यातून हे पिक हद्दपार झाल्याची स्थिती आहे. या पिक बदलाचा परिणाम हुरड्याचा ट्रेन्ड बदलण्यावरही झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी ज्वारीचे उत्पादन घेणो बंद केले असले तरी हुरड्यापुरती ज्वारी उत्पादन किंवा इतर ठिकाणांहून आणण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. त्यामुळे अनेक कृषी पर्यटन केंद्र परिसरातील शेतकऱ्यांकडून ज्वारी विकत घेऊन हुरडय़ाचे नियोजन करतात. तर काही ज्वारीचे पीक घेणारे शेतकरी स्वत: हुरडा पाटर्य़ाचे नियोजन करून या परंपरेला व्यावयिक स्वरूप देऊ लागले आहेत.

Web Title: Hooda Party's plan to colorize with the growing cold in the Nashik, along with jawar in rabi season, wheat and gram crops also became hurda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.