नायगाव खोऱ्यात हुडहुडी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 03:20 PM2020-01-10T15:20:45+5:302020-01-10T15:20:54+5:30
नायगाव - गेल्या दोन दिवसांपासुन कडाक्याच्या थंडीचे आगमन झाल्याने नायगावकरांना हुडहुडी भरली आहे. दोन दिवसांनपासून सुयदर्शन होत नसल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
नायगाव - गेल्या दोन दिवसांपासुन कडाक्याच्या थंडीचे आगमन झाल्याने नायगावकरांना हुडहुडी भरली आहे. दोन दिवसांनपासून सुयदर्शन होत नसल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या महिनाभरापासुन ढगाळ हवामान असल्यामुळे शेती पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे शेतकरी वर्गात चिंता व्यक्त होत होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल होऊन हुडहुडी भरविणा-या थंडीचे आगमन झाले आहे.सकाळ-संध्याकाळी वाजणा-या थंडीच्या प्रमाणात दोन दिवसांपासून वाढ झाली आहे.त्यामुळे दिवसभर नागरिकांना थंडीचा कडाका सहन करावा लागत आहे. दोन दिवसांपासून अचानक वाढलेल्या थंडीचा जरी नागरिकांना त्रास सहन करावा लागत असला तरी रब्बीच्या पिकांना ही थंडी लाभदायक ठरत आहे.ढगाळ हवामानात कोमाजलेले कांदा, गव्हू, हरभरा, तुर, टमाटा आदीसह रब्बीचे सर्वच पीक सध्या तरारली आहे. त्यामुळे शेतक-यांच्या औषधांचा खर्च व मेहनत वाचण्यास मदत होत असल्याने येणार्या मिहनाभरात थंडीचे प्रमाण टिकून रहावी अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहे. दरम्यान, अचानक वाढलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे वातावरणातील आद्रता वाढल्यामुळे नायगाव खो-यातील नागरिकांना हुडहुडी भरणा-या थंडीचा सामना करावा करावा लागत आहे.त्यातच सुर्य दर्शन होत नसल्याने सर्वच दैनंदिन कामे कासव गतीने होत आहे.या थंडीच्या वातावरणामुळे खो-यातील जनिजवन विस्कळीत झाले आहे.