लॉकडाऊनच्या काळात गुंडांचा उपद्रव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:15 AM2021-05-20T04:15:12+5:302021-05-20T04:15:12+5:30
शिक्षक भारतीच्या वतीने निबंध स्पर्धा नाशिक : शिक्षक भारती संघटनेच्या महिला आघाडीतर्फे पर्यावरण दिनानिमित्त शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन ...
शिक्षक भारतीच्या वतीने निबंध स्पर्धा
नाशिक : शिक्षक भारती संघटनेच्या महिला आघाडीतर्फे पर्यावरण दिनानिमित्त शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाची शिकवण वाचवा पर्यावरण, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, ऑक्सिजनसाठी वृक्ष संवर्धन असे तीन विषय देण्यात आले आहेत. या प्रकरणी ८६०५४३९८४९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इंधन, खत दरवाढ विरोधात आंदोलने
नाशिक : केंद्र सरकारने केलेली इंधन दरवाढ तसेच खतांच्या दरवाढीच्या विरोधात जिल्ह्यातील अनेक भागांत राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले आहे. कोरोना नियमांचे पालन करून मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आंदोलन केले जात आहे.
पंचक रुग्णालयात ॲप्रेनचे वाटप
नाशिक : जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून पंचक येथील रुग्णालयात परिचारिकांना ॲप्रेनचे वाटप करण्यात आले. समर्थ मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सुनील बोरोडे अध्यक्षस्थानी होते. आराध्य एंटरप्रायजेस आणि समर्थ सेवा मंडळातर्फे परिचारिकांचा सत्कारही करण्यात आला. याप्रसंगी सचिन गुरव, पंचक केंद्राचे प्रमुख गोपाल बैरागी, मुख्याध्यापक कचरू लभडे, पर्यवेक्षक नितीन जानकर, डॉ. मनीषा चव्हाण, गोरख बोराडे, कल्पेश बोराडे, मंगेश भोसले, सुनील पगार, लक्ष्मीकांत संत आदी उपस्थित होते.
नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी
नाशिक : चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे सातत्याने संकटाचा सामना करावा लागणाऱ्या शेतकऱ्यांना चक्रीवादळाचाही फटका बसला आहे. या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून मदत देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.