कोरोनाविरोधात आशा, अंगणवाडी सेविकांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 05:39 PM2020-04-02T17:39:55+5:302020-04-02T17:47:44+5:30
नाशिक : सध्या आरोग्य यंत्रणेवर खूप ताण पडलेला आहे. डॉक्टर, नर्सेस, सहायक कर्मचारी यांना दिवस-रात्र काम करावे लागत आहे. पुढील काही दिवसांत आशा, अंगणवाडी सेविका, होमगार्ड्स यांचे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांनादेखील मदतीसाठी तयार ठेवण्याचे निर्देश राज्य स्तरावरून मिळाले असल्याने आता त्यांना प्रशिक्षण देऊन कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या लढाईत सहभागी करून घेतले जाणार आहे.

राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कोरोना उपाययोजनांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्यावेळी अधिक काळजी घेण्याच्या आणि प्रसंगी कठोर उपाययोजना करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यानुसार आशा, अंगणवाडी सेविका, होमगार्ड्स यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून आवश्यक आरोग्य उपचार करून घेण्यात येणार आहेत. परराज्यातील कामगार, स्थलांतरित यांच्यासाठी आपण राज्यात निवारागृहे सुरू केली आहेत. त्यात कोणतीही अडचण येणार नाही आणि त्यांना पुरेशा सोयी मिळतील याबाबतदेखील विशेष दक्षता घेतली जाणार आहे. पुढील दहा-बारा दिवस अत्यंत महत्त्वाचे असल्याने शक्य तेवढ्या अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांची सेवा उपलब्ध करून घेण्यात येणार आहे.
ग्रामीण भागात उपचारासाठी पर्याय
कोरोनावर उपचार करण्यासाठी शासनाच्या वतीने शासकीय आणि कॉर्पोरेट हॉस्पिटल्समध्ये कोरोना यंत्रणा सज्जता ठेवण्यात आली होती. मात्र, जे सामान्य रुग्ण केवळ हवा बदलामुळे होणाºया सर्दी, खोकला किंवा तापासारख्या नियमित आजारांसाठी कोणत्याही रुग्णालयात जात होते, त्यांना शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जात होता. त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालय, ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र, उपकेंद्र, मनपाची रुग्णालये यांच्यातील डॉक्टर, नर्सेस, सहायक कर्मचारी यांच्यावर सामान्य रुग्णांचा ताणदेखील प्रचंड वाढला होता. मात्र, आता शासनाच्या वतीनेच आशा, अंगणवाडी सेविका, होमगार्ड्स यांना प्रशिक्षण देण्याबाबत पुढाकार घेतला जाणार आहे. त्यामुळे जिल्हाभरातील या सेवकांचा उपयोग शासकीय आरोग्य यंत्रणेवरील ताण काहीसा हलका करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.