माळवाडी बंधाऱ्यात ‘भोजापूर’चे पाणी येण्याच्या आशा मावळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 05:49 PM2018-12-11T17:49:32+5:302018-12-11T17:49:44+5:30
सिन्नर : भोजापूर धरणातून माळवाडी (फुलेनगर) बंधाºयात पाणी सोडण्याचे आरक्षण नसल्याचे कारण देत या बंधाºयात पाणी सोडण्यास प्रशासनाने नकारघंटा दर्शविल्याने माळवाडी बंधाºयात पाणी येण्याची आशा मावळली आहे.
सिन्नर : भोजापूर धरणातून माळवाडी (फुलेनगर) बंधाºयात पाणी सोडण्याचे आरक्षण नसल्याचे कारण देत या बंधाºयात पाणी सोडण्यास प्रशासनाने नकारघंटा दर्शविल्याने माळवाडी बंधाºयात पाणी येण्याची आशा मावळली आहे. पूर्व भागातील वावी परिसरातील शेतकºयांनी माळवाडी बंधाºयात पाणी आणण्यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर शेतकºयांचा भ्रमनिरास झाला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्यासमवेत वावी परिसरातील शेतकरी, पाटबंधारे खात्याचे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यात बैठक झाली. यात भोजापूर धरणातून या बंधाºयात पाणी सोडण्यास आरक्षण नसल्याचे कारण देता येणार नसल्याचे जिल्हाधिकाºयांनी स्पष्ट शब्दात सांगितल्याने शेतकरी नाराज झाले आहेत. भोजापूरच्या पाण्याकडे आस लावून बसलेल्या शेतकºयांना आता पावसाळ्यात धरण ओव्हरफ्लो होऊन पूरपाण्याची वाट पाहण्याशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस आमदार राजाभाऊ वाजे यांच्यासह सायाळे येथील सामाजिक कार्यकर्ते विजय शिंदे, सुधाकर भगत, नितीन अत्रे, विष्णू सांगळे, सदाशिव सांगळे, चंद्रभान तांबडे, नबाजी खरात यांच्यासह शेतकºयांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.