.रब्बीच्या आशा पल्लवित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 11:27 PM2019-10-09T23:27:25+5:302019-10-09T23:27:52+5:30
ओतूर : सांडव्यातून विसर्ग सुरू असल्याने समाधानओतूर : कळवण तालुक्यातील ओतूर धरण यावर्षी ओव्हरफ्लो झाल्याने व आजही सांडव्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असून, रब्बी पिके बहरणार असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

खरीप हंगामातील मका पिकावर लष्करी अळीने थैमान घातल्याने यावर्षी मक्याचे उत्पादन घटणार आहे. त्यातच सतत पडणाºया जोरदार पावसामुळे इतर खरीप पिकांचे नुकसान झाले असून, लाल व उन्हाळ कांद्याची रोपे सडली आहेत. त्यामुळे बळीराजाच्या नजरा रब्बी पिकाकडे वळल्या. सध्या पाऊस दोन दिवसाआड पडत असल्याने उन्हाळ कांद्याची रोपे टाकणे लांबणीवर पडले आहे. धरण ओव्हर फ्लो झाल्याने सिंचनप्रश्न सुटला आहे. यामुळे आता रब्बी पिकांच्या बहरण्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.