नाशिक पूर्व भागातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामाची आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 03:43 PM2018-09-22T15:43:44+5:302018-09-22T15:45:19+5:30

नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील एकलहरे, सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, जाखोरी, हिंगणवेढे, कालवी, पाडळी, लाखलगाव, ओढा, शीलापूर, माडसांगवी, गंगावाडी या भागातील शेतकरी बाराही महिने भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. त्यात प्रामुख्याने कोबी, फ्लॉवर

Hope of Rabi season for farmers from Nashik East region | नाशिक पूर्व भागातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामाची आशा

नाशिक पूर्व भागातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामाची आशा

Next
ठळक मुद्देपालेभाज्या, फळभाज्यांना प्राधान्य : परतीच्या पावसावर लक्षपंचक्रोशीतील शेतकरी शेतातील माल काढणीचे वेळापत्रकाही ठरवून घेतले

नाशिक : नाशिक तालुक्यातील पूर्व भागातील शेतकºयांना परतीच्या पावसाचे वेध लागले असून, सध्या खरिपाची पिके पूर्णत्वास आल्याने शेतक-याचे लक्ष रब्बी हंगामाच्या तयारीवर लागले आहे. गेल्या आठवड्यात परतीच्या पावसाने लावलेल्या हजेरीमुळे पिकांना जीवदान मिळण्यास मदत झाली आहे.
नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील एकलहरे, सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, जाखोरी, हिंगणवेढे, कालवी, पाडळी, लाखलगाव, ओढा, शीलापूर, माडसांगवी, गंगावाडी या भागातील शेतकरी बाराही महिने भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. त्यात प्रामुख्याने कोबी, फ्लॉवर, मेथी, शेपू, कोथिंबीर, भेंडी, गवार, वांगे याबरोबरच कारले, गिलके, भोपळा, दोडका, डांगर या पालेभाज्या व फळभाज्यांचे पिके बारमाही घेतली जातात. हा सर्व शेतमाल नाशिकरोड सिन्नरफाटा मार्केट, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती, त्याचबरोबर सायखेडा, पिंपळगाव बसवंत येथील बाजार समितीत भाजीपाला विक्रीसाठी नेला जातो. किरकोळ भाजीपाला विक्रेते मोटारसायकलवर गाठोडे बांधून किंवा एक दोन क्रेट ठेवून नाशिकरोड उड्डाण पुलाखाली तसेच जेलरोड सायट्रिक कंपनीच्या समोरील भाजीबाजारात विक्रीसाठी पाठवितात. फळभाज्या व पालेभाज्यांच्या बाजारातील आवकेवरच लिलावाचे भाव अवलंबून असल्यामुळे पूर्व भागातील शेतक-यांकडून बाजारात एकाच प्रकारच्या भाजीपाल्याची जादा आवक होणार नाही याची काळजी घेतली जाते. त्यामुळे पंचक्रोशीतील शेतकरी शेतातील माल काढणीचे वेळापत्रकाही ठरवून घेतले आहे.
चौकट===
रब्बीवर आशा लागून
पोळ्याच्या आमावस्येनंतर सुरू होणाºया भाद्रपदाच्या पहिल्या पंधरवड्याला सुना भादवा आणि दुसºया पंधरवड्याला जेवता भादवा अर्थात पित्रुपक्ष म्हणतात. भाद्रपदाचे ऊन फारच कडक असते. या उन्हाचा काही पिकांना लाभ तर काहींना नुकसान पोहोचते. अशा वेळीच परतीच्या पावसाला सुरुवात होत असल्याने हा पाऊस शेतीसाठी खूपच लाभदायी असतो. या पावसामुळे विहिरींना पाणी उतरते पुढे हेच विहिरीचे पाणी रब्बी हंगामातील पिकांनाही उपयुक्त ठरते. सप्टेंबरअखेर व आक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात सोयाबीन, भुईमूग, मका, कपाशी, बाजरी, तूर, मूग, मठ ही पिके काढली जातात व त्यानंतर शेतकरी रब्बीच्या तयारीला लागतो. दसरा ते दिवाळी दरम्यान शेतकरी रब्बी हंगामातील गहू, हरबरा, ज्वारी, कांदे ही पिके पेरण्यास सुरुवात करतात.

Web Title: Hope of Rabi season for farmers from Nashik East region

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.