दिंडोरी तालुक्याला पावसाची आस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2021 10:55 PM2021-08-11T22:55:31+5:302021-08-11T22:55:31+5:30

वणी : दिंडोरी तालुक्यातील धरणांमध्ये पाणीसाठा असमाधानकारक झाला असून, ओझरखेड धरणात अत्यल्प, तर तीसगाव धरणात अल्प जलसाठा, अशी स्थिती असल्याने या भागातील पाणलोट क्षेत्रात मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. त्याची प्रतीक्षा करण्यात येत आहे.

Hope for rain in Dindori taluka | दिंडोरी तालुक्याला पावसाची आस

दिंडोरी तालुक्याला पावसाची आस

Next
ठळक मुद्देपुणेगाव प्रकल्पात अत्यल्पसाठा

वणी : दिंडोरी तालुक्यातील धरणांमध्ये पाणीसाठा असमाधानकारक झाला असून, ओझरखेड धरणात अत्यल्प, तर तीसगाव धरणात अल्प जलसाठा, अशी स्थिती असल्याने या भागातील पाणलोट क्षेत्रात मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. त्याची प्रतीक्षा करण्यात येत आहे. दिंडोरी तालुक्यात करंजवण, पुणेगाव, वाघाड, पालखेड या धरणांच्या जलसाठ्यात वाढ होण्याची प्रतीक्षा आहे. काही धरणांमध्ये तुलनात्मक कमी जलसाठा आहे. दरम्यान, ओझरखेड धरणात या धरणांच्या तुलनेत अत्यल्प पाणीसाठा, तर तीसगाव धरणात अल्प साठा आहे. वणी- दिंडोरी रस्त्यावरील वणीपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या ओझरखेड धरणातून चांदवड तालुक्यातील छत्तीस गावांमध्ये पाणीपुरवठा करणारी योजना कार्यान्वित आहे. वणी शहराला या धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. लखमापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांना पाणीपुरवठा नियमित होतो, तसेच पाणी वापर संस्था या धरणातील पाण्याचा वापर करतात. सप्तशृंग गडावरील पर्वतरांगांतील पावसाचे काही भागातील पाणी, तसेच पायथ्याशी असलेल्या नद्या, नाले, आहिवंतवाडी, भातोडे व परिसरातील भूभागावरील नद्या, नाले, ओहोळ, तसेच ओझरखेड धरणात विविध स्रोतांद्वारे जाणारे पाणी, तसेच वणी भागातील देवनदी यातून पावसाचे पाणी प्रामुख्याने धरणात जाते. मात्र, दमदार व जोमदार पावसाची व अखंडित पडणाऱ्या मोठ्या पावसाची गरज आहे. जेणेकरून धरणातील जलसाठ्याच्या पातळीत वाढ होईल. दरम्यान, पुणेगाव धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर त्यातील जलसाठा ओझरखेड धरणात सोडण्यात येतो. तेव्हा ओझरखेड धरण भरते, असा प्रतिवर्षीचा अनुभव आहे.

पुणेगाव प्रकल्पात अत्यल्पसाठा

सद्य:स्थितीत पुणेगाव धरणात अत्यल्प जलसाठा आहे. त्यात मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी पुणेगाव धरणात जाण्यासाठीच्या पर्यायी व्यवस्थेमुळे पुणेगाव धरण लवकर भरून ओझरखेड धरण भरण्यासाठीच्या आशा जिवंत आहेत. साधारणपणे डिसेंबर महिन्याच्या अंतिम सत्रापासून ओझरखेड धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा येवला व लगतचे तालुके करतात. कारण त्यावेळी शेतीसाठी पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे ओझरखेड धरणावर पाणीपुरवठ्याचा प्रचंड ताण पडतो, तसेच दिंडोरी शहरासाठी पाणीपुरवठ्याचे काम या धरणातून करण्यासाठीच्या नियोजनाचा विचार करता ओझरखेड धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे.

Web Title: Hope for rain in Dindori taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.