नाशिकच्या विमानतळावर हॉपिंग फ्लाइट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 12:03 AM2017-09-09T00:03:23+5:302017-09-09T00:07:16+5:30
नाशिकमध्ये विमानसेवा सुरू होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असून, दक्षिण भारत आणि उत्तर भारतात जाणाºया विमानांसाठी नाशिकला थांबा देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, असे मत पर्यटन राज्यमंत्री जयकुमार रावल यांनी गुरुवारी (दि. ६) ट्रॅव्हल असोसिएशन आॅफ नाशिक (तान) आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यातर्फे आयोजित ‘नाशिक ट्रॅव्हल मार्ट-२०१७’च्या उद्घाटनप्रसंगी केले.
नाशिक : नाशिकमध्ये विमानसेवा सुरू होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असून, दक्षिण भारत आणि उत्तर भारतात जाणाºया विमानांसाठी नाशिकला थांबा देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, असे मत पर्यटन राज्यमंत्री जयकुमार रावल यांनी गुरुवारी (दि. ६) ट्रॅव्हल असोसिएशन आॅफ नाशिक (तान) आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यातर्फे आयोजित ‘नाशिक ट्रॅव्हल मार्ट-२०१७’च्या उद्घाटनप्रसंगी केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पर्यटनासाठी नाशिकचे किल्ले ‘रोल मॉडेल’ ठरावे, असे सांगितले, तसेच महाराष्ट्रात टुरिस्ट गाइड तयार व्हावेत यासाठी ग्वाल्हेरच्या धर्तीवर स्वतंत्र शिक्षणक्रम सुरू करण्याचे आवाहन केले. यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबईचे सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, प्रसन्न पटवर्धन, शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना तानचे अध्यक्ष दत्ता भालेराव यांनी केले. यावेळी व्यासपीठावर आमदार सीमा हिरे, राहुल अहिरे, उपमहापौर प्रथमेश गिते, प्रसन्न पटवर्धन, मनोज वासवानी, ब्रीजमोहन चौधरी, लक्ष्मण सावजी, नारायण शेलार आदी उपस्थित होते.