संप्रेरकाचे असंतुलन लठ्ठपणाला कारणीभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 12:31 AM2018-07-23T00:31:57+5:302018-07-23T00:32:12+5:30

स्त्रीच्या काखेत आणि पुरुषाच्या कमरेवर मूठभर चरबी हाताला लागली तर लठ्ठपणाला निमंत्रण मिळाले असे समजावे. लठ्ठपणाचे विविध कारणे असू शकतात; मात्र महत्त्वाचे कारण म्हणजे संप्रेरकाचे (हार्मोन्स) असंतुलन हे आहे, त्यामुळे आपल्या संप्रेरकाचे संतुलन बिघडणार नाही, याबाबत दक्षता घेतली की लठ्ठपणा टाळता येऊ शकतो, असे प्रतिपादन आहारतज्ज्ञ डॉ. विनिता देशपांडे यांनी केले.

 Hormonal imbalance causes obesity | संप्रेरकाचे असंतुलन लठ्ठपणाला कारणीभूत

संप्रेरकाचे असंतुलन लठ्ठपणाला कारणीभूत

googlenewsNext

नाशिक : स्त्रीच्या काखेत आणि पुरुषाच्या कमरेवर मूठभर चरबी हाताला लागली तर लठ्ठपणाला निमंत्रण मिळाले असे समजावे. लठ्ठपणाचे विविध कारणे असू शकतात; मात्र महत्त्वाचे कारण म्हणजे संप्रेरकाचे (हार्मोन्स) असंतुलन हे आहे, त्यामुळे आपल्या संप्रेरकाचे संतुलन बिघडणार नाही, याबाबत दक्षता घेतली की लठ्ठपणा टाळता येऊ शकतो, असे प्रतिपादन आहारतज्ज्ञ डॉ. विनिता देशपांडे यांनी केले.  स्वर्गीय रामनाथशेठ चांडक व्याख्यानमालेचे पहिले पुष्प रविवारी (दि.२२) कु र्तकोटी शंकराचार्य न्यास संकुलात मुलाखत सत्राच्या स्वरुपात पार पडले. यावेळी मुलाखतकार किशोरी कुलकर्णी, सुप्रिया देवघरे यांनी ‘सहज हवन होते’ या विषयावर देशपांडे यांच्याकडून विविध प्रश्नांच्या माध्यमातून लठ्ठपणाची कारणे, लक्षणे व उपायांबाबतची माहिती उपस्थितांसमोर उलगडण्याचा प्रयत्न केला. जेव्हा रक्तात साखर वाढते आणि त्याचा थेट संबंध इन्शुलिन नावाच्या द्रव्याशी येतो तेव्हा साखरेचे रुपांतर चरबीमध्ये होण्यास मदत होते, त्यामुळे साखरेपेक्षा इन्शुलिनवर अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
डायट म्हणजे उपासमार नव्हे
आजकाल ‘डायट’चे फॅड आले असून, हे अत्यंच चुकीचे आहे. सरावलेले अन्न म्हणजे डायट होय. डायट ही एक प्रणाली आहे, उपासमार नव्हे. सरावण्यासाठी कालावधी द्यावा लागतो. त्यामुळे आपल्या मनाने कुठलीही गोष्ट करू नये किंवा ‘गुगल सर्च’च्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रयोग करणे टाळावे, असे देशपांडे यांनी यावेळी सांगितले.

Web Title:  Hormonal imbalance causes obesity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक