वाढदिवस साजरा होताना हॉर्न वाजविला; केक च्या चाकूनेच केला युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 08:53 PM2020-06-17T20:53:08+5:302020-06-18T00:25:05+5:30

लासलगाव: निफाड तालुक्यातील पिंपळगावनजीक येथे इंदिरानगर परिसरात मंगळवारी (दि. १६) रात्री भररस्त्यावर साहील इमरान शेख याचा वाढदिवस साजरा केला जात असताना रस्त्यावरून जाणाऱ्या आकाश शरद शेजवळ (२९) आणि चेतन बाळू बैरागी (३०) यांनी त्यांच्या वाहनाचा हॉर्न वाजविल्याच्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले.

The horn sounded during the birthday celebration; The murder of the youth was done with the knife of the cake | वाढदिवस साजरा होताना हॉर्न वाजविला; केक च्या चाकूनेच केला युवकाचा खून

वाढदिवस साजरा होताना हॉर्न वाजविला; केक च्या चाकूनेच केला युवकाचा खून

Next

लासलगाव: निफाड तालुक्यातील पिंपळगावनजीक येथे इंदिरानगर परिसरात मंगळवारी (दि. १६) रात्री भररस्त्यावर साहील इमरान शेख याचा वाढदिवस साजरा केला जात असताना रस्त्यावरून जाणाऱ्या आकाश शरद शेजवळ (२९) आणि चेतन बाळू बैरागी (३०) यांनी त्यांच्या वाहनाचा हॉर्न वाजविल्याच्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. यावेळी टोळक्यातील एकाने वाहन-चालकावर केक कापण्यासाठी आणलेल्या चाकूनेच वार करत प्राणघातक हल्ला केला, तर त्याच्या मदतीसाठी धावलेल्या चेतन बैरागीवरही वार झाल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला. या खूनप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, मुख्य संशयितासह सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सध्या कोरोनामुळे गर्दी जमविण्यास बंदी आहे. तरीही वाहेगावकडे जाणाºया रस्त्यावर मंगळवारी रात्री साडेआठ वाजता जमुन साहील इम्रान शेख याचा वाढदिवस केक कापून साजरा केला जात होता. याचवेळी इर्टिगा कारमधून आकाश शरद शेजवळ (रा. इंदिरानगर) आणि चेतन बाळू बैरागी (रा. सहकारनगर, पिंपळगावनजीक) हे रस्त्यावरून जात असताना गर्दीमुळे चालकाने गाडीचा हॉर्न वाजविला.
रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाºया टोळक्याला त्याचा राग येऊन त्यांनी वाहन थांबवत चालक आकाश शेजवळ याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याचवेळी साहील इमरान शेख याने वाढदिवसाचा केक कापण्यासाठी आणलेल्या चाकूनेच आकाशवर वार करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आकाशवर वार होत असतानाच जवळच बसलेल्या चेतन बाळू बैरागी हा आकाशच्या मदतीसाठी येत असताना टोळक्याने चेतनलाही लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. याचवेळी साहील इमरान शेख याने त्याच्यावरही चाकूने वार करत गंभीर जखमी केले. त्यानंतर टोळक्याने तेथून पलायन केले.
दरम्यान, दोघा जखमींना निमगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले असता चेतन बैरागी याचा मृत्यू झाला.
--------------------
१ भररस्त्यात, चौकात तलवारीसह धारदार शस्राने केक कापून वाढदिवस साजरे करण्याचे फॅड भाईगिरी करणाऱ्यांमध्ये अलीकडे खूप वाढले आहे. त्यातून बºयाचदा हाणामारीच्या, वादाच्याही घटना घडल्या असून, दहशत माजविण्याचेही प्रकार जिल्ह्यात घडले आहेत.
२ मुख्य संशयित साहिल इमरान शेख याने आपला वाढदिवस रस्त्यावर साजरा करताना वाद झालेल्या चालकाच्या गाडीच्या बोनेटवरच केक कापण्याचा हट्ट धरला होता, अशीही माहिती समोर येत आहे. या वाढत्या गुंडगिरीला वेसण घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
३ बुधवारी दुपारी चेतन बैरागी याचा मृतदेह शव चिकित्सेनंतर सहकारनगर परिसरातील त्याचे घरी आणला असता आपल्या मुलाचा मृतदेह पाहून आईचा शोक अनावर झाला.
चार दिवसांवर होता विवाह
चेतन बैरागी हा चारचाकी वाहनावर चालक म्हणून काम करत होता. त्याचा विवाह चार दिवसांवर आला होता. त्याचे विवाहाचे कपडेही गाडीतच होते, अशी माहिती मिळाली आहे. त्याच्या खून प्रकरणी मुख्य संशयितासह सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती निफाडचे पोलीस उपअधीक्षक माधव रेड्डी यांनी पत्रकारांना दिली. बुधवारी अतिरिक्त पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी लासलगाव पोलीस ठाण्यात येऊन ताब्यात घेतलेल्या संशयितांची कसून चौकशी केली.
-----------------
खुनाचा गुन्हा दाखल; एकावर प्राणघातक हल्ला
जिल्ह्यात कोरोनामुळे गर्दी जमविण्यास प्रतिबंध केलेला असतानाही आदेशाचे उल्लंघन करणे आणि खून करतानाच एकावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी आकाश शरद शेजवळ (२९) याने दिलेल्या फिर्यादीवरून साहील इमरान शेख, फिरोज अकबर शहा, इम्रान सलीम सय्यद, रोहित शिरसाठ, कृष्णा वर्पे, अरु ण माळी, राजू राजुळे, काळू लहाने, दत्तू जाधव व इतर दोन ते तीन आरोपी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: The horn sounded during the birthday celebration; The murder of the youth was done with the knife of the cake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक