Accident in Lasalgaon: लासलगावात भीषण अपघात, कंटेनरने बस चालकाला फरफटत नेले, मृतदेहाचे तुकडे तुकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 10:33 AM2021-10-30T10:33:13+5:302021-10-30T10:33:55+5:30

Accident in Lasalgaon: एसटी चालकाला कंटेनरने फरफटत नेल्याने मृतदेहाचे तुकडे तुकडे झाले. या  अपघातात निकम यांना नाहक ऐन दिवाळीच्या सणात आपला जीव गमवावा  लागला आहे.

Horrific accident in Lasalgaon, bus driver swept away by container, body parts | Accident in Lasalgaon: लासलगावात भीषण अपघात, कंटेनरने बस चालकाला फरफटत नेले, मृतदेहाचे तुकडे तुकडे

Accident in Lasalgaon: लासलगावात भीषण अपघात, कंटेनरने बस चालकाला फरफटत नेले, मृतदेहाचे तुकडे तुकडे

googlenewsNext

नाशिक - लासलगाव आगाराची लासलगाव ते  तुळजापूर  एम एच 14  _  36 41 ही बस  आज सकाळी आगारात प्रवेश करत असताना कंटेनर नंबर एम एच वाय 4763 ने धक्का दिल्याने  बसचा चालक एस. पी.निकम यांनी खाली उतरून पाहणी करीत अस्ताना चालकाला कंटेनरने फरफटत नेल्याने मृतदेहाचे तुकडे तुकडे झाले. या  अपघातात निकम यांना नाहक ऐन दिवाळीच्या सणात आपला जीव गमवावा  लागला आहे. त्यामुळे लासलगावकर सुन्न झाले. संतप्त बसचालक व वाहक तसेच बस आगारातील कर्मचारी संतप्त झाले व बस सेवा बंद पडली.

नाशिक येथून बसचालक एस. पी.निकम हे लासलगाव येथे आले. सकाळी बस स्थानकावर चालक एस. पी.निकम यांनी  आगाराचे व्यवस्थापक समर्थ शेळके व  राजेंद्र दारके यांचे सह चहा घेतला व आगारातून बस स्थानकात रस्त्याने आत घेत असताना बसला केंटरने धक्का दिला व अपघात झाला. हा कंटेनर चालक भरधाव वेगाने बस स्थानक ते गुंजाळ पेट्रोलपंपासमोर असलेल्या अमित नंदकुमार बिरार व सलिमभाई कलर वाले यांचे दुकानांना धडका देत व एका स्कूटी गाडीला धडक देत हा कंटेनर थांबला. या अपघातात चालक निकम यांचे मृतदेहाचा रस्त्यावर अक्षरशः रक्ताचा सडा पडला होता. ही घटना समजताच लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ हे कर्मचारीसह दाखल झाले व  निकम यांच्या मृतदेहाचे तुकडे गोळा करून अंबुलंसमध्ये टाकला.

सध्या बस चालक वाहकांच्या संप सुरू होता परंतु काल बससेवा सुरू झाली. आज बस कर्मचारी परत संपाचे मानसिकतेत होते. परंतु दिवाळीमुळे बस सुरू करतात अशी विनंती करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ व बस आगार    प्रमुख समर्थ शेळके यांचेत चर्चा झाली त्यानुसार आज सकाळी सहा वाजेपासून बसेस सुरू झाल्या व ही  दुर्घटना घडली.

त्यामुळे   संतप्त बस कर्मचारी संतप्त झाले आणि बस कर्मचारी त्यांनी बस सुरू झाल्याबद्दल चालकांनी त्या चालकाच्या अपघाती मृत्यू बद्दल जोरदार टीका केली. नंतर लगेच पोलीस निरीक्षक राहुल वाघ सहकाऱ्यांसमवेत दाखल झाले सदर कर्मचारी यांचेशी संवाद साधला. जिल्हा परिषद सदस्य डी.के.जगताप यांनी कर्मचारी यांची भेट घेतली. दरम्यान राज्य परिवहन मंडळ नाशिकचे विभाग   प्रभारी नियंत्रक  मुकुंद कुवंर , विभागीय अधिकारी कैलास पाटील, सुरक्षा अधिकारी अजित भारती व कामगार अधिकारी शेख या लासलगाव दाखल झाल्या आहेत.

Web Title: Horrific accident in Lasalgaon, bus driver swept away by container, body parts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.