राजापूर येथे घोड्यांचा उपद्रव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 07:01 PM2018-09-18T19:01:34+5:302018-09-18T19:02:16+5:30
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील वनविभागाच्या जंगलात कोणी तरी तीस चाळीस घोडे सोडण्यात आल्याने या घोडयाच्या टोळक्यांनी बऱ्याच शेतकºयांच्या पिंकाचे नूकसान केले आहे राजापूर गाव परिसरात या घोड्यांनी हैदोस घातला असून वनविभागाच्या शेजारलील शेतकºयांना या घोडयांना शेतातून बाहेर काढण्यासाठी रात्रं दिवस पहारा करावा लागत आहे.
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील वनविभागाच्या जंगलात कोणी तरी तीस चाळीस घोडे सोडण्यात आल्याने या घोडयाच्या टोळक्यांनी बऱ्याच शेतकºयांच्या पिंकाचे नूकसान केले आहे राजापूर गाव परिसरात या घोड्यांनी हैदोस घातला असून वनविभागाच्या शेजारलील शेतकºयांना या घोडयांना शेतातून बाहेर काढण्यासाठी रात्रं दिवस पहारा करावा लागत आहे. काही शेतकºयांनी घोडयांना वनविभागाच्या कॉलनीत आणून ठेवले होते, मात्र सदर घोडे ताब्यात घेता येणार नाही असे सांगितल्याने वनविभागाच्या कर्मचाºयांनी ते घोडे सोडून दिल्याची तक्र ार शेतकरी विजय धात्रक यांनी केली आहे. तालुक्यातील शेतकºयांच्या शेतात यापुर्वीच हरणांचा त्रास असून त्यांच्याकडून शेतीचे मोठ्या प्रमाणात नूकसान होत आहे. आता त्यात घोड्यांनी उभ्या पिकात हल्ला चढविला आहे. त्यामुळे बºयाच शेतकºयांचे नुकसान झाले आहे. हे घोडे कुणाचे आहेत, हे अद्याप गत तीन महिन्यांपासून तपास नाही. तसेच वनविभागाच्या जंगलात या घोड्यांनी बरेच नूकसान केल्याच्या तक्र री आहेत. वनविभागाने या घोड्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.