अश्व जोपासतोय जेजुरी वारीची परंपरा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 01:27 PM2019-11-26T13:27:20+5:302019-11-26T13:27:28+5:30

नांदूरवैद्य : महाराष्ट्रातील नवसाला पावणारे जेजुरी येथील खंडोबा मंदिर हे सर्वञ प्रसिद्ध आहे. चंपाषष्ठीनिमित्त या ठिकाणी महाराष्ट्रातून लाखो भाविक खंडोबाच्या दर्शनासाठी तसेच नवसपूर्ती करण्यासाठी येत असतात.त्याचप्रमाणे या ठिकाणी चंपाषष्ठीनिमित्त मोठा उत्सव साजरा करण्यात येतो.

 Horse harvesting is the tradition of Jejuri Wari! | अश्व जोपासतोय जेजुरी वारीची परंपरा !

अश्व जोपासतोय जेजुरी वारीची परंपरा !

googlenewsNext
ठळक मुद्देनांदूरवैद्य : चंपाषष्ठीला गडाची वारी, खंडोबाचरणी नृत्याची जुगलबंदी


नांदूरवैद्य : महाराष्ट्रातील नवसाला पावणारे जेजुरी येथील खंडोबा मंदिर हे सर्वञ प्रसिद्ध आहे. चंपाषष्ठीनिमित्त या ठिकाणी महाराष्ट्रातून लाखो भाविक खंडोबाच्या दर्शनासाठी तसेच नवसपूर्ती करण्यासाठी येत असतात.त्याचप्रमाणे या ठिकाणी चंपाषष्ठीनिमित्त मोठा उत्सव साजरा करण्यात येतो. या उत्सावात विशेष म्हणजे महाराष्ट्रातील नामवंत नृत्य सादर करणारे अश्व या ठिकाणी भाविक घेऊन येत असतात. याच पाशर््वभूमीवर नांदूरवैद्य येथील कैलास कर्पे यांचे देखील हे नृत्य करणारे अश्व अनेक वर्षांपासून चंपाषष्ठीला जेजुरीची वारी करीत आहेत.
संपूर्ण जिल्ह्यात आपल्या नृत्याच्या अदाकारीने प्रेक्षकांची मने जिंकत आलेल्या नांदूरवैद्य येथील कैलास कर्पे दरवर्षी आपल्या अश्वाला जेजुरी गडावर घेऊन जातात. गडाला असणाऱ्या ३८५ पाय-या हा अश्व काही वेळातच चढुन खंडोबाला दोन पाय जमिनीवर ठेऊन खंडोबाचरणी लोटांगण घालतो. हा क्षण पाहण्यासाठी भाविक गर्दी करत असतात. गडावर महाराष्ट्रातून आलेल्या अश्वांच्या नृत्याची जुगलबंदी होते. ही डोळ्याची पारणे फेडणारे नृत्यविष्कार पाहून उपस्थित भाविक आनंदाने भारावून जातात.या ठिकाणी खंडोबाला नांदूरवैद्य येथील ग्रामस्थांच्या वतीने अभिषेक करण्यात येतो.अश्वाबरोबर संपूर्ण मंदिराला वाजत गाजत फेरी मारली जाते. यानंतर खंडोबाला गडावरच तयार करण्यात आलेला नैवैद्य दाखविण्यात येऊन महाप्रसादाचे वाटप केले जाते.गेली अनेक वर्षांपासून ही परंपरा अश्वप्रेमी असलेले कर्पे कुटुंब दरवर्षी न चुकता जेजुरी गडावर मनोभावे येत असून या बरोबर ग्रामस्थांची देखील या वारीमध्ये दरवर्षी वाढ होतांना दिसत आहे. यानंतर खंडोबाची सामुहिक आरती करून कार्यक्र माची सांगता करण्यात आली.

Web Title:  Horse harvesting is the tradition of Jejuri Wari!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक