जलसंधारणमंत्र्यांचे वराती मागून घोडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 01:22 AM2018-10-27T01:22:09+5:302018-10-27T01:23:17+5:30
दुष्काळ जाहीर करण्याबाबत शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार पीक, पाण्याची झालेली पाहणी व त्याचा अहवाल शासन दरबारी सादर होऊन राज्य शासनाने दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केल्यानंतर जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी जिल्ह्णातील तीन तालुक्यांची पाहणी करून दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्याची बाब म्हणजे ‘वराती मागून घोडे’ असल्याचे बोलले जात आहे.
नाशिक : दुष्काळ जाहीर करण्याबाबत शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार पीक, पाण्याची झालेली पाहणी व त्याचा अहवाल शासन दरबारी सादर होऊन राज्य शासनाने दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केल्यानंतर जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी जिल्ह्णातील तीन तालुक्यांची पाहणी करून दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्याची बाब म्हणजे ‘वराती मागून घोडे’ असल्याचे बोलले जात आहे.
शासनाने दुष्काळसदृश म्हणून जाहीर केलेल्या तीन तालुक्यांपैकी दोन तालुक्यांत सामान्य पीक परिस्थिती असल्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला असताना त्याच तालुक्यांना शिंदे यांनी भेट दिल्यामुळे तर तेथील शेतकरीही बुचकळ्यात पडले आहेत.
पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दोन आठवड्यापूर्वी जिल्ह्णातील पाच तालुक्यांना भेटी दिल्या, तर उर्वरित तीन तालुक्यांना जलसंधारणमंत्री राम शिंदे हे भेट देणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु शिंदे यांना कार्यबाहुल्यामुळे पाहणी दौºयासाठी वेळ मिळाला नाही. ज्या तीन तालुक्यांत शिंदे यांनी भेट दिली त्यातील इगतपुरी व नाशिक तालुक्यांतील परिस्थिती साधारण असल्याचा निष्कर्ष निघाला आहे.शासनाने आठ तालुक्यांना दुष्काळसदृश म्हणून जाहीर करून टाकले तर या आठ तालुक्यांमध्ये कृषी, महसूल खात्याने केलेल्या प्रत्यक्ष पीक सत्यापनात फक्त मालेगाव, बागलाण, सिन्नर व नांदगाव या चार तालुक्यांतच पीक परिस्थिती गंभीर असल्याचा अहवाल शासनाला सादरही करून टाकला. अशी परिस्थिती असताना राम शिंदे यांनी शुक्रवारी सिन्नर, इगतपुरी व नाशिक या तीन तालुक्यांत दुष्काळ पाहणी दौरा केला.