दिंडोरीत ६० ऑक्सिजन बेडचे रुग्णालय सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:15 AM2021-05-11T04:15:07+5:302021-05-11T04:15:07+5:30

दिंडोरी तालुक्यात पहिल्या लाटेत हॉस्पिटलची गरज भासली नव्हती. त्यावेळी अगोदर पिंपरखेड व नंतर बोपेगाव येथे विलगीकरण केंद्र सुरू होते, ...

Hospital of 60 oxygen beds started in Dindori | दिंडोरीत ६० ऑक्सिजन बेडचे रुग्णालय सुरू

दिंडोरीत ६० ऑक्सिजन बेडचे रुग्णालय सुरू

Next

दिंडोरी तालुक्यात पहिल्या लाटेत हॉस्पिटलची गरज भासली नव्हती. त्यावेळी अगोदर पिंपरखेड व नंतर बोपेगाव येथे विलगीकरण केंद्र सुरू होते, तर अत्यावश्यक उपचारासाठी नाशिक येथे पाठविण्यात येत होते. यंदा मात्र अधिक संख्येने रुग्ण आढळून येत असल्याने तालुक्यात रुग्णालयाची गरज भासू लागली. विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी याबाबत बैठक घेत वणी येथील ट्रामा केअर सेंटरचे रूपांतर कोविड सेंटरमध्ये करत येथे ३० ऑक्सिजन बेडची सुविधा सुरू केली, तर दिंडोरी रुग्णालय हे इतर रुग्णांसाठी सुरू ठेवण्यात आले. मात्र सातत्याने रुग्णसंख्या वाढत असल्याने ही व्यवस्थाही अपुरी पडू लागल्याने वणी ग्रामीण रुग्णालयात पुन्हा ३० ऑक्सिजन बेडचे अतिरिक्त कोविड सेंटर उभे करण्यात आले. त्यानंतर दिंडोरी येथेही ३० बेडचे कोविड सेंटर येथील आयटीआय वसतिगृहात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र याच काळात ऑक्सिजन पुरवठा कमी झाल्याने व शासकीय निधीचा प्रश्न निर्माण झाल्याने हे सेंटर कार्यान्वित करण्यास अडचणी आल्या होत्या. परंतु विविध उद्योजकांनी ७५ सिलिंडरची मदत केल्याने वणी येथील कोविड सेंटर कार्यान्वित झाले.

कोट.....

तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी वणी व दिंडोरीत तीन कोविड रुग्णालय सुरू झाले. सुमारे १२० ऑक्सिजन बेडची उपलब्धता झाली आहे. अजूनही आवश्यक पडल्यास सुविधा उपलब्ध केल्या जातील. गावोगाव विलगीकरण कक्ष सुरू होत आहे. नागरिकांनी वेळीच तपासणी व उपचार करावे.

- नरहरी झिरवाळ, प्रभारी अध्यक्ष, विधानसभा

इन्फो

विलगीकरण कक्षात सुविधा

दिंडोरी येथे माजी आमदार रामदास चारोस्कर मित्रमंडळाने राजे मंगल कार्यालयात सौम्य लक्षणे असलेल्या कोविड रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष सुरू केला आहे. येथे मोफत औषधे व तपासणी केली जात असून, नाश्ता-जेवण दिले जात आहे. तातडीच्या गरजेसाठी ऑक्सिजन सेवा उपलब्ध केली आहे. त्यासाठी अनेक नागरिकांनी मदतीचा हात दिला आहे. दिंडोरीतील अनेक डॉक्टर येथे रुग्णांची दैनंदिन तपासणी करत आहे.

Web Title: Hospital of 60 oxygen beds started in Dindori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.