कोरोनामुक्त करतानाच रुग्णालयाने बिल केले माफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:14 AM2021-05-27T04:14:36+5:302021-05-27T04:14:36+5:30
ओझर येथील ८२ वर्षांच्या मेहरुमा शेख व त्यांचा मुलगा जब्बार शेख ह्या दोघांना कोरोनाचा संसर्ग झाला. घरची हालाखीची परिस्थिती ...
ओझर येथील ८२ वर्षांच्या मेहरुमा शेख व त्यांचा मुलगा जब्बार शेख ह्या दोघांना कोरोनाचा संसर्ग झाला. घरची हालाखीची परिस्थिती आणि वैद्यकीय उपचाराच्या खर्चाचे मोठे आकडे पाहून ह्या माता-पुत्रासह कुटुंबीय हतबल झाले होते. ही माहिती उषा हॉस्पिटलचे डॉ. योगेश चौधरी यांना समजताच त्यांनी त्वरित दोघांना त्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतले. डॉ. योगेश चौधरी यांच्यासह डॉ. तृप्ती चौधरी व कर्मचारी वर्गाने मेहरुमा शेख व जब्बार शेख यांचे मनोबल उंचावत उपचार सुरू केले. व्यवस्थापक डॉ. श्याम देशमुख, डॉ. नीलेश तूपलोंढे, डॉ. फैजल, डॉ. शहा यांच्यासह अगदी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी या दोघांचीही दहा दिवस विशेष काळजी घेतली. त्यास या रुग्णांनीही चांगली साथ दिल्याने दोघेही कोरोनामुक्त होत घरी परतले. विशेष म्हणजे उषा हॉस्पिटलचे डॉ. चौधरी यांनी दोघांना केवळ कोरोनामुक्त न करता त्यांचे हॉस्पिटलचे संपूर्ण बिल माफ करण्याचा मोठेपणा दाखवला. त्यामुळे शेख कुटुंबीय भारावून गेले. कोरोनामुक्त झाल्यानंतर या दोघांचा हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार करीत त्यांना निरोप दिला. चौधरी दाम्पत्याची वैद्यकीय सेवेत दिलासा देणारी ही बाब चर्चेचा विषय बनली आहे.
काेट....
याआधीही आम्ही परोपकार नाही तर एक सामाजिक दायित्व म्हणून गरीब कुटुंबांना उपचारासाठी मदत करण्याचे काम केले आहे. कोरोना काळात कोणत्याही रुग्णाने घाबरून जाऊ नये. अशावेळी धीरोदत्त बनले पाहिजे. योग्य उपचाराने हा आजारही बरा करता येतो. त्यासाठी मनोबल वाढवण्याची, संयम, शिस्त आणि नियमांचे योग्य पालन करण्याची गरज आहे.
- डॉ. योगेश चौधरी, ओझर
फोटो- २६ उषा हॉस्पिटल
ओझर येथील उषा हॉस्पिटलमधून कोरोनामुक्त होऊन घरी परतताना मेहरुमा शेख व त्यांचा मुलगा जब्बार शेख. समवेत डॉ. योगेश चौधरी, डॉ. तृप्ती चौधरी, डॉ. श्याम देशमुख, डॉ. नीलेश तूपलोंढे, डॉ. फैजल, डॉ. शहा व अन्य कर्मचारी.
===Photopath===
260521\26nsk_17_26052021_13.jpg
===Caption===
फोटो- २६ उषा हॉस्पिटल ओझर येथील उषा हॉस्पिटलमधून कोरोनामुक्त होऊन घरी परतताना मेहरुमा शेख व त्यांचा मुलगा जब्बार शेख. समवेत डॉ योगेश चौधरी, डॉ सौ तृप्ती चौधरी, डॉ शाम देशमुख, डॉ निलेश तुपलोंढे, डॉ फैंजल, डॉ शहा व अन्य कर्मचारी.