चुंचाळे येथील रुग्णालयाची इमारत नावालाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:16 AM2021-02-16T04:16:10+5:302021-02-16T04:16:10+5:30
अंबड : महानगरपालिकेच्या चुंचाळे शिवारातील संजीवनगर येथे नागरिकांच्या सोयीसाठी रुग्णालय बांधण्यात आले खरे; परंतु हे रुग्णालय नावाला असून, रुग्णालयाची ...
अंबड : महानगरपालिकेच्या चुंचाळे शिवारातील संजीवनगर येथे नागरिकांच्या सोयीसाठी रुग्णालय बांधण्यात आले खरे; परंतु हे रुग्णालय नावाला असून, रुग्णालयाची इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. पुरेसे मनुष्यबळच उपलब्ध नसल्याने ही अडचण निर्माण झाली असून, हे रुग्णालय कधी सुरू होणार असा प्रश्न केला जात आहे. चुंचाळे हा कामगार वस्तीचा भाग असून, येथील परिसर वाढत आहे. परंतु, त्या तुलनेत परिसरात अनेक सुविधा नाही. महापालिकेने या भागात रुग्णालय बांधले; परंतु त्याचा कोणताही उपयोग होत नाही. या रुग्णालयात पुरसे
पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे त्यासाठी कारण दिले जात आहे. सध्या या रुग्णालयात सध्या एकच वैद्यकीय अधिकारी व एक परिचारिका नियुक्त केलेली असून, सध्या फक्त किरकोळ आजारांवर उपचाराची सोय आहे. म्हणजेच ओपीडीप्रमाणेच सोय असून, अन्य कोणत्याही प्रकारची उपचाराची सुविधा नाही. वैद्यकीय सुविधांचा अभाव असून, प्रसूती गृह व इतर अत्यावश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने चुंचाळे ग्रामस्थांना सातपूरच्या मायको किंवा अन्य खासगी रुग्णालयामध्येच उपचारासाठी यावे लागते. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या या इमारतीमध्ये अद्ययावत व सर्व सुविधा चेावीस तास उपलब्ध होण्यासाठी अजून किती काळ प्रतीक्षा करावी लागणार, असा सवाल चुंचाळे ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे. महानगरपालिका प्रशासनाने याबाबत तत्काळ ठोस पावले उचलावी, अशी मागणी होत आहे.
कोट...
वैद्यकीय विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने रुग्णालय सुरू करता आलेले नाही. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची पदे भरण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. त्यानंतर पूर्णक्षमतेने रुग्णालय सुरू करता येईल.
- डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, मनपा
===Photopath===
150221\15nsk_14_15022021_13.jpg
===Caption===
चुंचाळे येथील रूग्णालय इमारत