कृषिमंत्र्यांकडून रुग्णालय स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:14 AM2021-05-23T04:14:12+5:302021-05-23T04:14:12+5:30

पावसाळ्यास लवकरच सुरुवात होणार आहे. पावसाळ्यातील दुर्घटना टाळण्यासाठी प्रत्येक विभागाने दक्षता बाळगावी. समन्वयातून नदी, नाल्यांची नियमितपणे सफाई करण्यात यावी. ...

Hospital cleaning campaign by the Minister of Agriculture | कृषिमंत्र्यांकडून रुग्णालय स्वच्छता मोहीम

कृषिमंत्र्यांकडून रुग्णालय स्वच्छता मोहीम

Next

पावसाळ्यास लवकरच सुरुवात होणार आहे. पावसाळ्यातील दुर्घटना टाळण्यासाठी प्रत्येक विभागाने दक्षता बाळगावी. समन्वयातून नदी, नाल्यांची नियमितपणे सफाई करण्यात यावी. तालुका, ग्रामपातळीवरील आराखडे अद्ययावत करावे. पावसाळ्यात साथीचे आजार पसरण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे आरोग्य यंत्रणांनी सतर्क राहावे. औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून घ्यावा. शुध्द पाण्याचा पुरवठा होईल, असे नियोजन करावे, अशा सूचना भुसे यांनी यावेळी दिल्या.

यावेळी उपमहापौर नीलेश आहेर, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.किशोर डांगे, डॉ.हितेश महाले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे राहुल पाटील, महानगरपालिकेचे उपायुक्त रोहिदास दोरकुळकर, वैभव लोंढे, राजू खैरनार, रामा मिस्तरी, प्रमोद शुक्ला, विनोद वाघ, राजेश गंगावणे, छाया शेवाळे यांच्यासह स्वच्छता निरीक्षक व सफाई कामगार उपस्थित होते.

इन्फो

औषध साठ्याची पाहणी

महिला रुग्णालयातील औषध भांडारातील औषध साठ्याची पडताळणी भुसे यांनी केली. तर सामान्य रुग्णालयातील ड्रेनेज टाक्यांसह त्याची पाईपलाईन व इतर किरकोळ कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. कोणीही व्यक्ती रस्त्यावर कचरा टाकत असेल वा थुंकत असेल तर त्याला प्रत्येकाने प्रतिबंध करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

फोटो- २२ दादा भुसे

मालेगाव येथील सामान्य रुग्णालयासह कोविड सेंटर परिसरात कृषिमंत्री दादा भुसे यांनी स्वच्छता मोहीम राबवली.

===Photopath===

220521\22nsk_28_22052021_13.jpg

===Caption===

फोटो- २२ दादा भुसेमालेगाव येथील सामान्य रुग्णालयासह कोविड सेंटर परिसरात कृषी मंत्री दादा भुसे यांनी स्वच्छता मोहीम राबवली. 

Web Title: Hospital cleaning campaign by the Minister of Agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.